Udyanraje On Pawar : कर्म असतं, शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचं उदयनराजेंकडून समर्थन

sharad pawar: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर एसटी कामगारांनी केलेल्या आंदोलनाचे (msrtc protest) भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी समर्थन केलं आहे.

Udyanraje On Pawar : कर्म असतं, शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचं उदयनराजेंकडून समर्थन
कर्म असतं, शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचं उदयनराजेंकडून समर्थनImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 12:33 PM

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर एसटी कामगारांनी केलेल्या आंदोलनाचे (msrtc protest) भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी समर्थन केलं आहे. तसेच या हल्ल्यावरून त्यांनी पवारांवर खोचक टीकाही केली आहे. कर्म आहे ना, ते कर्म या जन्मी करतो ते याच जन्मी फेडावे लागते, अशी खोचक टीका करत उदयनराजे भोसले यांनी या हल्ल्याचं समर्थन केलं. घराणेशाही संपली पाहिजे. लोकशाही टिकली पाहिजे. राज्यामध्ये सध्या घराणेशाही चालू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना घराणेशाहीसाठी पक्ष चालवत आहेत. मुलगा, मुलगी, नातू पक्षामध्ये आमदार-खासदार होत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. काल एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आंदोलन केलं होतं. यावेळी आंदोलकांनी पवारांच्या घराच्या दिशेने चप्पलही भिरकावली होती. या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचा भाजपच्या प्रमुख नेत्यांनी निषेध नोंदवला आहे. मात्र काही नेत्यांनी या हल्ल्याचं समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यात आता उदयनराजे यांनीही या हल्ल्याचं समर्थन केलं आहे.

उदयनराजे भोसले काल कोल्हापुरात आले होते. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिडणुकीतील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उदयनराजे भोसले आले होते. यावेळी ते बोलत होते. यालापोटनिवडणूक म्हणता येणार नाही. वैचारिक स्थिरतेला योगदान दिले पाहिजे. यासाठी कोल्हापूरमध्ये आलो आहे. आपण सर्वांनी विचार केला.. आपले विचार एकत्र येतात असे लोक कायम स्वरूपी एकत्र येतात.. उद्दिष्टे साध्य झाले की त्याची दिशा वेगवेगळ्या असल्याने वेगळे होतात..महाराष्ट्रामध्ये असे वातावरण आहे, असा टोला उदयनराजे यांनी शिवसेनेला लगावला.

घराणेशाहीने काँग्रेसची काय अवस्था केली

घराणेशाही आली. ती घातक आहे. आज काँग्रेस पक्षाचे काय झाले? काय अवस्था झाली? हीच अवस्था राष्ट्रवादी आणि शिवसेनेची होईल. आम्हीच आम्ही असा अहंकार या पक्षांचा आहे. या पश्चिम महाराष्ट्राने भरभरून मतदान केले. यांना अहंकार आला. पण तुमच्यामुळे समाज नाही. लोकशाहीची पदे आपण भूषावतो हे जनतेमुळे आहेत. जो योगदान देईल जो विकास करेल तो कोणत्याही जातीचा असो.. त्यांना संधी देण्याचं काम भाजपने केलं. काँग्रेसवाल्यानी सत्तेचं केंद्रीकरण केले. त्यामुळे त्यांची आज अवस्था पाहातच आहात. मतदारांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे. याचा परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतो. विकास थांबतो. सत्ता कोणाचीही असो लोकांच्या हक्कांवर गदा येता कामा नये, असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेना महाराजांचा विचार आचरणात का आणत नाही?

उत्तर कोल्हापूर मधील निवडणूक ही महाराष्ट्राला दिशा देणारी निवडणूक आहे. मीच मोठा झालो पाहिजे का? तू मागासवर्गीय आहेस.. तो तू आहेस, असं का केलं जात आहे. केंद्रीकरण हवे असेल तर व्होट बँक टीकली पाहिजे. शिवसेना तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर स्थापन झालेला पक्ष आहे. मग त्याचे विचार आचरणात का आणत नाहीत? यातून फक्त स्वार्थ यातून दिसतो. कोल्हापूरमधील लोक स्वाभिमानी आहेत. सर्व महाराष्ट्रामधील लोक स्वाभिमानी आहेत. माझ्यासाठी काही करू नका स्वतःच्या मुलासाठी मतदान करा. येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. मतदार कधी पुढे येणार? जेव्हा सर्वसामान्य माणसाला निवडून दिला तर पुढे येणार, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut: सदावर्तेंना भाजपचं पाठबळ, राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्यांकडूनच हल्ल्याचं समर्थन; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut: सर्व एसटी कर्मचाऱ्यांकडे एकाचवेळी प्लॅटफॉर्म तिकीट कुठून आले?, यामागे कोणती यंत्रणा आहे?; राऊतांचा सवाल

Maharashtra News Live Update : मीडियाला माहित होतं, मग पोलिस काय करत होते – देवेंद्र फड़णवीस

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.