लाडक्या बहिणीचा सर्वोच्च बहुमान! विजय रहाटकर ठरल्या हे पद भूषविणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन

भाजप नेत्या आणि राजस्थान भाजपच्या सहप्रभारी विजया राहाटकर यांना आता सरकारकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. हे पद भूषवणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

लाडक्या बहिणीचा सर्वोच्च बहुमान! विजय रहाटकर ठरल्या हे पद भूषविणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 3:29 PM

मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेत्या आणि राजस्थान भाजपच्या सहप्रभारी विजया राहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारकडून  राहटकर यांंना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आली असून, तीन वर्ष एवढा त्यांच्या पदाचा कार्यकाळ असणार आहे.दरम्यान यापूर्वी त्यांनी हाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम केलं आहे. तसेच  त्या भाजपच्या राजस्थानच्या सहप्रभारी आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाचं अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महाराष्ट्रातील महिला ठरल्या आहेत. त्यांना आता केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा दर्जा असणार आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाला अनेक महत्त्वाचे अधिकार देण्यात आले आहेत. महिलांच्या विकासासाठी कायदेशीर आणि घटनात्मक बाबींचा फेर आढावा घेणे, संसदीय आणि वैधानिक शिफारशी करणे, महिलांचे प्रश्न सोडवणे, महिलांच्या तक्रारीची दखल घेऊन त्या तक्रारीचे योग्य त्या पातळीवर निवारण करणे. महिलांविषयक धोरणात्मक बाबींसाठी केंद्र व राज्य सरकारांना सल्ला देणे असे अनेक अधिकार महिला आयोगाच्या अखत्यारीमध्ये येतात. 1992 मध्ये विशेष कायद्यान्वये महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. महिला आयोगाला दिवाणी  न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत.

विजया राहाटकर या भाजपच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एक आहेत. त्या छपत्रपती संभाजीनगरच्या महापौर होत्या. आपल्या महापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी शहरात अनेक विकास काम केली. त्यांच्या कार्यकाळात शहरात आरोग्य सुविधेपासून ते भौतिक सुविधेपर्यंत अनेक महत्त्वाची कामं मार्गी लागली. महापौर पदाच्या काळात विजया राहटकर या महाराष्ट्र मेयर कौन्सिलच्या अध्यक्षा आणि ऑल इंडिया मेयर कौन्सिलच्या उपाध्यक्षदेखील होत्या. त्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र महिला आयोगाची जबाबदारी देण्यात आली. तिथे देखील त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या कार्याची दखल घेत आता त्यांची सरकारकडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्राप्त आहे. तसेच त्या भाजपच्या राजस्थान सहप्रभारी देखील आहेत.

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....