भाजप पदाधिकाऱ्याकडून राष्ट्रवादीची ‘तुतारी’ वाजवत लग्नपत्रिकेचे वाटप, चर्चा तर रंगणारच

lok sabha election 2024: भाजप पदाधिकारी असलेले बलदेवराव चोपडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चिन्ह असलेले तुतारी घेऊन गावागावत मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटप सुरु केले आहे. यामुळे आता राजकीय चर्चाही रंगली आहे.

भाजप पदाधिकाऱ्याकडून राष्ट्रवादीची 'तुतारी' वाजवत लग्नपत्रिकेचे वाटप, चर्चा तर रंगणारच
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 9:20 AM

गणेश सोळंकी, बुलढाणा | दि. 11 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. इच्छूक उमेदवार उमेदवारी मिळण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या व्यक्तीने सुरु केलेल्या प्रकारामुळे चर्चा रंगली आहे. भाजप पदाधिकारी असलेले बलदेवराव चोपडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चिन्ह असलेले तुतारी घेऊन गावागावत मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटप सुरु केले आहे. दोन तुताऱ्या वाजवून कुंकू लावत औक्षण करून जिल्हाभर अनेक घरी लग्नपत्रिका वाटल्या जात आहेत. लोकसभेच्या धामधुमीत राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.

दोन वेळा पक्षांतर आता भाजपात

भाजपाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष बलदेवराव चोपडे यांनी दोन वेळा पक्षांतर केले आहे. आता भाजपमध्ये ते आहेत. त्यांचा मुलगा आदित्य याच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटप त्यांनी सुरु केले आहे. दोन तुताऱ्या वाजवून कुंकू लावत औक्षण करून जिल्हाभर नातवाईक, मित्र परिवाराच्या घरी लग्नपत्रिका वाटल्या जात आहेत. लोकसभेच्या धामधुमीत पत्रिका वाटपाचा हा अफलातून प्रकार राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.

कधीकाळी होते जिल्हा शिवसेना प्रमुख

बलदेवराव चोपडे हे बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालचे पहिले शिवसेना जिल्हाप्रमुख होते. नंतर ते काँग्रेसमध्ये आल्यावर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती बनले. आता ते भारतीय जनता पक्षात असून जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्यांचा मुलगा आदित्य याचा शुभविवाह येत्या १ एप्रिल रोजी संतनगरी शेगावात होत आहे. ती लगीनघाई चोपडे परिवारात सुरू आहे. चोपडे यांना तिन्ही पक्षांनी आतापर्यंत फक्त झुलवत ठेवले. लोकसभेसाठी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर यांचे नाव पुढे आले आहे. मात्र बलदेवरावांचा राजकीय बँडबाजा अजून वाजायला तयार नाही.

हे सुद्धा वाचा

‘तुतारी वाजवणारा माणूस’ राष्ट्रवादीचे चिन्हा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ‘तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्ह शरद पवार गटाला मिळाले. यामुळे भाजपकडून तिकीट न मिळाल्यास शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची तयारी बलदेवराव चोपडे तर करीत नाही ना? अशी चर्चा रंगली आहे. ‘तुतारी वाजवणारा माणूस’ बलदेवरांच्या सोबत असल्यामुळे हा राष्ट्रवादी पवार गटाचा प्रचार चालला की काय ?, अशीही शंका येत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.