आतली बातमी, भाजप विद्यमान आमदारांचीही तिकीटं कापणार? राजकारणात पडद्यामागे काय घडतंय?

निवडणुकीची घोषणा होण्याआधी महायुतीत हालचालींना वेग आलाय. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याबरोबरच, विद्यमान आमदारांना सरसकट तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय.

आतली बातमी, भाजप विद्यमान आमदारांचीही तिकीटं कापणार? राजकारणात पडद्यामागे काय घडतंय?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 9:49 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत भाजपकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. दिल्लीत अमित शाह, जेपी नड्डांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 12 नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या सर्वच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही, असं ठरल्याचं सूत्रांची माहिती आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या आमदारांनाच तिकीट दिलं जाईल. ज्या आमदारांची कामगिरी कमी असेल त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. पहिल्या यादीमध्ये भाजपचे सध्याचे मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांच्या नावांचा समावेश असणार आहे. भाजपच्या दिल्लीतल्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्व विधानसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाली. यावेळी तयारीचा आढावा घेण्यात आला. उमेदवारांच्या नावाची प्राथमिक छाननीही झालीय. बुधवारी आचारसंहिता आणि निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बुधवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पहिली यादी येण्याची शक्यता आहे.

दिल्लीत बैठक झाल्यानंतर आता महायुतीची पत्रकार परिषदही होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत महायुतीचा फॉर्म्युला समोर येणार आहे. दरम्यान, दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत अमित शाह, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, जे. पी. नड्डा, आशिष शेलार, पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस हे नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे दिल्लीत जावून अमित शाह यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

विरोधकांच्या गोटात काय सुरु?

महायुतीच्या गोटात जशा जोरदार घडामोडी सुरु आहेत तशाच विरोधकांमध्ये सुद्धा सुरु आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या गोटातही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत हायकमांडसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी काम न करता महाविकास आघाडीसाठी काम करा, अशा सूचना महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मित्र पक्ष सोबत घ्या, मेरीट वरच उमेदवारी द्या, असं मत दिल्लीतल्या बैठकीत काँग्रेस हायकमांडने व्यक्त केलं आहे.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.