VIDEO: बारामतीचा पोलीस तरुणीला लॉजवर घेऊन गेला, दुसऱ्याच्या बायकोच्या हातावर पोलिसाचा टॅटू; पडळकरांनी वाचला गुन्ह्यांचा पाढा

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधान परिषदेत पुणे जिल्ह्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला. विशेष म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पाढा पडळकर यांनी वाचला. बारामतीचा एक पोलीस एका तरुणीला लॉजवर घेऊन जातो.

VIDEO: बारामतीचा पोलीस तरुणीला लॉजवर घेऊन गेला, दुसऱ्याच्या बायकोच्या हातावर पोलिसाचा टॅटू; पडळकरांनी वाचला गुन्ह्यांचा पाढा
बारामतीचा पोलीस तरुणीला लॉजवर घेऊन गेला, दुसऱ्याच्या बायकोच्या हातावर पोलिसाचा टॅटू; पडळकरांनी वाचला गुन्ह्यांचा पाढाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 1:59 PM

मुंबई: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी आज विधान परिषदेत पुणे (pune) जिल्ह्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला. विशेष म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पाढा पडळकर यांनी वाचला. बारामतीचा (baramati) एक पोलीस एका तरुणीला लॉजवर घेऊन जातो. त्यांचे चित्रीकरण होते आणि ती क्लीप व्हायरल होते. पण त्या अधिकाऱ्यावर कोणतीच कारवाई होत नाही. गुन्हा दाखल केला जात नाही. पुण्यातच तहसील कार्यालयात काम करत असलेल्या तरुणीचा विनयभंग होतो. एक अनोळखी व्यक्ती ऑफिसमध्ये येऊन या तरुणीचे चुंबन घेऊन निघून जातो. पण त्याच्यावरही गुन्हा दाखल केला जात नाही. तो तरुण अजूनही सापडत नाही. कुटुंबात भांडण झालेल्या एका महिलेचा फोन घेऊन एमपीएससीची तयारी करायच्या बहाण्याने एक पीएसआय या महिलेला पुण्याला आणून ठेवतो. जाब विचारायला गेलेल्या या महिलेच्या नवऱ्याला मारण्याची धमकी देतो, हे चाललंय काय? असा संतप्त सवाल गोपीचंद पडळकर यांनी सरकारला केला.

गोपीचंद पडळकर यांनी आज विधान परिषदेत पुणे जिल्ह्यातील पोलिसांचे कारनामे उघड केले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. पुणे जिल्ह्यात बारामतीचा शिंदे नावाचा एक इन्स्पेक्टर एका तरुणीला घेऊन लॉजवर जातो. लॉजवर गेल्यावर ती चित्रीकरण करते. ते चित्रीकरण सोशल मीडियावर सर्वत्रं व्हायरल होतं. हे व्हायरल झाल्यानंतर तिथले लोकप्रतिनिधी त्याची तडकाफडकी बदली करतात. हे जर प्रकरण असं असेल तर त्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद का केला नाही? जर त्याची चूक नव्हती तर त्याची बदली कशासाठी केली? बारामतीत म्हणे प्रशासनावर त्यांचं प्रचंड वर्चस्व आहे. ही बारामतीतील कहानी आहे. या अधिकाऱ्यावर गुन्हा का दाखल केला नाही. कोण त्याला पाठिशी घालत आहे? कशासाठी घालत आहे? याचा हिशोब महाराष्ट्राताील गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे, असं पडळकर म्हणाले.

अनोळखी व्यक्ती चुंबन घेऊन गेला

ही एकच घटना नाहीये. तर तहसीलदार ऑफिसात एक क्लर्क मुलगी टेबलवर बसली होती. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती आला आणि तिचं चुंबन घेऊन गेला. ती मुलगी त्याच्या पाठी शिव्या देत धावली. पण तोपर्यंत त्याने पोबारा केला होता. अजून तो तपासात सापडला नाही. त्याच्यावर गुन्हा नोंद नाही. त्याचं सीसीटीव्ही फुटेज आलं आहे. तो चोरी करायला गेला होता, असं उत्तर दिलं गेलं. ओळखपाळख नसताना हा प्रकार घडला, असं त्यांनी सांगितलं.

महिलेच्या अंगावर पोलिसाचा टॅटू

पै पाव्हण्यात भांडण झाल्याने एक महिला पोलीस ठाण्यात गेली होती. पीएसआय मोहिते यांनी हे प्रकरण संपवलं. यावेळी या महिलेने बोलताना तिला एमपीएससी करायचं असल्याचं मोहितेंना सांगितलं. मी तुला मार्गदर्शन करतो असं सांगून मोहितेंनी तिचा नंबर घेतला. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झालं. त्यानंतर या महिलेने एमपीएससी करण्यासाठी पुण्याला जायचं असल्याचा तगादा नवऱ्याकडे लावला. त्यावर तुला पुण्याला घेऊन जातो, तुझी हॉस्टेलला राहण्याची व्यवस्था करतो असं नवऱ्याने सांगितलं. पण, मोहिते यांच्याशी माझी ओळख असून त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे माझी राहण्याची सोय केल्याचं या महिलेने नवऱ्याला सांगितलं.

त्यानंतर ती पुण्याला गेली. दोन महिन्यानंतर तिचे फोन यायचे बंद झाल्याने तो पत्नीला भेटायला गेला. तेव्हा त्या महिलेच्या अंगावर त्या पीएसआयच्या नावाचा टॅटू होता. तेव्हा त्या महिलेच्या नवऱ्याने मोहितेंना फोन करून तुम्ही माझा संसार का बरबाद करत आहात अशी विचारणा केली. त्यावर मोहितेने त्यांना धमकावलं. हातपाय तोडण्याची धमकी दिली. तुझ्या बायकोच्या नावाने माझ्या कंपनीतील 10 टक्के शेअर ठेवले आहेत, असं त्याने सांगितलं. या मोहितेंची कोणती कंपनी आहे याचा शोध घेतला पाहिजे. या मोहितेंवर गुन्हा दाखल झालेला नाही. त्याची चौकशी झालेली नाही. त्यावर बोलण्याचं धारिष्ट्य सरकार दाखवत नाही. ही सर्व प्रकरणं पुणे ग्रामीणच्या एसपींना माहीत आहे. तरीही कारवाई होत नाही, असा दावाही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

फडणवीसांना कोणत्याही कटात फसवण्याचा सरकारचा हेतू नाही; दिलीप वळसे पाटीलांची स्पष्टोक्ती

VIDEO: माझ्या वडिलांना दोन वर्ष, काकूंना 18 महिने तुरुंगात ठेवलं, आम्ही तुरुंगाला घाबरणारे नाही; देवेंद्र फडणीस कडाडले

Maharashtra News Live Update : महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक आता गुजरातचे नेतृत्व करायला लागले; पटोलेंचा रावसाहेब दानवेंना टोला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.