देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत; किसन कथोरेंचे साईबाबांना साकडे; संजय राऊतांमुळे ‘मविआ’वर ही वेळ…

एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच किसन कथोरे यांनी मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत; किसन कथोरेंचे साईबाबांना साकडे; संजय राऊतांमुळे 'मविआ'वर ही वेळ...
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी किसन कथोरेंनी घेतले साईबाबांचे दर्शनImage Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 3:38 PM

शिर्डीः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच दुसरीकडे मात्र भाजप समर्थक लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्री पदासाठी घाई लागली आहे. महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) सध्या टांगती तलवार असली तरी राज्यातील ठाकरे सरकार अजून पायउतार होण्याआधीच मुरबाडच्या आमदार किसन कथोरे (BJP MLA Kisan Kathore) यांनी शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले आहे. साईदर्शनासाठी आपण का आलो आहे हे सांगताना त्यांनी सांगितले की, साईबाबांच्या दर्शनाला आज खास करून यासाठी आलो आहे की, राज्यातील विकास महाविकास आघाडीमुळे थांबला आहे.

राज्यातील तो विकास पुन्हा सुरू व्हावा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व्हावेत ही साईचरणी प्रार्थना करण्यासाठी आलो आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

फडणवीस मुख्यमंत्री बनतील

एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच किसन कथोरे यांनी मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आमदार किसन कथोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाविषयी आपले मत व्यक्त करताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांनी त्यांच्या हा निर्णय घ्यायला उशीर झाला असून हा निर्णय लवकरच त्यांनी घ्यायला हवार होता असंही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजप-शिवसेना सरकारसाठी शिंदे आग्रही

किसन कथोरे यांनी एकनाथ शिंदे यांचा निर्णय आणि भूमिका ही त्यांची पहिल्यापासूनच होती, भाजप-शिवसेना हे सरकार स्थापन व्हावे यासाठी ते आग्रही होते असंही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेविषयी आपले मत व्यक्त केले. आमदारांच्या कामांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षापासून शिवसेनेच्याच आमदारांचीच काम होते नव्हती, त्यामुळे ही खदखद एकनाथ शिंदे यांच्या मनात होती आणि ती या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्यानिमित्ताने बाहे पडली आहे असंही त्यांनी सांगितले.

आजची वेळ संजय राऊतांमुळे…

राज्यसभेच्या निवडणुकी खासदार म्हणून जे काटावर पास झाले आहेत, त्या खासदार संजय राऊत यांनी संयम ठेवायला हवा होता,संजय राऊत यांनी संयम ठेवला असता तर आजची ही वेळ आलीच नसती, तसेच शिवसेनेला खरा धक्का बसला आहे तो संजय राऊता यांच्यामुळे बसला आहे असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

त्यांच्यावर कोणताही दबाव नाही…

एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या आमदारांविषयी बोलताना त्यांनी बंडखोर आमदारांनी त्यांनी स्वतः निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या आमदारांनी निर्णय घेतला आहे, तो निर्णय त्यांचा आहे. त्यापैकी एकावर दबाव येऊ शकतो मात्र 40 आमदारांवर एकाच वेळी दबाव कसा येऊ शकतो असा सवालही त्यांनी आमदारांच्या पाठिंब्यावर उपस्थित केला.

वरिष्ठ नेत्यांनी गद्दारी

बंडखोर आमदारांना आपल्या मतदार संघात विकास पाहिजे आहे, त्या मुद्यासाठीच ते बाहेर पडले आहेत, त्यामुळेच राज्याच्या जनेतेने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला होता मात्र शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी गद्दारी करून भाजपाला बाहेर ठेवल्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत असे मतही त्यांनी व्यक्त केले. तसेच शिवसेनेचे अनेक आमदार भाजपमुळे निवडून आले होते, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याने राज्याच्या विकासाची दिशा बदलणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.