मुलाला वाचवण्यासाठी 50 कोटींची ऑफर, उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आमदाराचा सर्वात मोठा आरोप
सुजित पाटकरला अटक झाली. तो संजय राऊत यांचा भागीदार आहे. राज्यातल्या एका महिलेच्या घरी रात्री एक वाजता बाटली मारली जाते याला जबाबदार कोण? संजय राजाराम राऊत बोलणार यात माझा सबंध नाही. पण, मी स्वतः यासंबधी पाठपुरावा करणार आहे.
विनायक डावरुंग, मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबद्दल जे गलिच्छ विचार मांडलेत. त्यानंतर देशभरातून प्रत्येकाच्या तोंडी असे विचार एक मुख्यमंत्री कसा बोलू शकतो अशी टीका होतेय. इंडिया अलायन्समध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे. आम्हाला वाटलं उद्धव ठाकरे यांचा कामगार नितीश कुमारवर टीका करेल. पण, गलिच्छ मानसिकतेचे प्रदर्शन संजय राऊतकडून झालं. सनातनबद्दल बोलले मात्र त्या घटनेवर बोलला नाही. आता तर महिलांबद्दल एवढं बोललं गेलं तरी हा बोलला नाही, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.
आज सकाळी एका वृत्तपत्रात बातमी आली की, स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. त्यांच्या घरावर एक वाजता बाटल्या फेकून मारल्या. तू जास्त टिवटीव करते, तुला कोण वाचवणार असे धमकीचे पत्र दिले. या स्वप्ना पाटकर कोण आहेत की ज्यांना शिव्या देताना संजय राऊत यांची एक क्लिप व्हायरल झाली होती. स्वप्ना पाटकर यांच्या घरात भीतीचे वातवरण आहे त्याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सुजित पाटकरला अटक झाली. तो संजय राऊत यांचा भागीदार आहे. राज्यातल्या एका महिलेच्या घरी रात्री एक वाजता बाटली मारली जाते याला जबाबदार कोण? संजय राजाराम राऊत बोलणार यात माझा सबंध नाही. पण, मी स्वतः यासंबधी पाठपुरावा करणार आहे. त्या महिलेच्या कुटूंबाला भेट देणार आहे. असे जर कुणी महिलेला धमकवत असेल तर त्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही, असा इशाराही आमदार राणे यांनी दिला.
तसाच प्रकार हा दिशा सालीयन हिच्याबाबत झाला आहे. दिशा सालीयन आणि सुशांत सिंह यांच्याबाबत केस सुरू आहे. आदित्य ठाकरे आणि रिया हिचे चाट आहेत ही माहिती याचिकाकर्ते यांनी दिली. हा कुठलाही राजकीय आरोप नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडून या याचिका कर्त्याला 50 खोक्यांची ऑफर दिली होती असा आरोप नितेश राणे यांनी केला. शक्ती कपूर सारख्या मुलाला वाचवण्यासाठी 50 कोटींची ऑफर ठाकरे यांनी दिली. ही माहिती जर खोटी असेल तर तुम्ही आमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोका, असे आव्हानही नितेश राणे यांनी दिले.
मातोश्रीमध्ये काय वस्त्रहरण सुरू आहे. मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर काय वेगळं चाललं आहे? तुझ्या मालकाच्या मुलाचे काय चाळे सुरु आहेत. राज्यात असा कुठलाही प्रकरचे गॅंगवार नाही. माझ्या माहितीनुसार सर्व आलबेल आहे. संजय राऊत याला सामनाची नोकरी पुरत नसेल तर तुला मंत्रालयात चहा देण्याची नोकरी देऊ करत बस वासूगिरी अशी टीका त्यांनी केली.
राज्यात काही झाले तरी त्याचे कारण आदित्य ठाकरे आहेत. कुणला मुल होत नसले तर त्याचे कारणही आदित्य ठकारे आहेत. रोहित पवार याचे केस सफेद झाले याचे कारण पण आदित्य ठाकरे आहेत. आता राऊत काही टीवटीव करत असेल तर ते पाहणं हेच काम बाकी राहिलं आहे. संजय राऊत यांना सांगेन की सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचे गाने लावण्यापेक्षा आदित्य ठाकरे याचे गाने लावू. देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. त्यांचा आवाज चांगला आहे. पण, पुरुष असताना महिलेच्या आवाजात आदित्य गाऊ शकतात हे एक टॅलेंट आहे. त्याच्यासाठी हवे तर नागपूर अधिवेशनात एक कार्यक्रम लावतो असा खरमरीत टोलाही त्यांनी लगावला.