मनोज जरांगे 24 तास राजकारणी, सेटलमेंट बादशाह…कोणी केला थेट आरोप?

नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, गृहमंत्री होण्यापूर्वी तुझे घर संभाळ. मातोश्रीमध्ये एक शकूनी मामा आहे. संजय राऊत हे त्या ठिकाणी शकुनी मामा आहेत. आता सिल्वर ओकचे शकुनी मामा म्हणजे रोहित पवार आहे.

मनोज जरांगे 24 तास राजकारणी, सेटलमेंट बादशाह...कोणी केला थेट आरोप?
Manoj jarange
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 9:56 AM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत रंगत वाढत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत सरळ सामना होत आहे. यावेळी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी प्रत्यक्षात निवडणुकीत उडी घेतली नाही. परंतु मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या लोकांना पाडा, असे त्यांनी आता जाहीरपणे म्हटले आहे. मनोज जरांगे यांना राणे पिता-पुत्रांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. आता आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षण हा विषय आता बाजूला राहिला आहे. ते आता 24 तास राजकारणी झाले आहेत. सेटलमेंट बादशाह झाले आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

लाडकी बहीणमुळे झोप उडाली

लाडकी बहीण योजनेमुळे महाविकास आघाडीतील लोकांची झोप उडाली आहे. आता त्यांनी आमचीच योजना नाव बदलून आणली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेसचे समर्थक कोर्टात गेले होते. सरकार आले तर या सगळ्या योजना बंद करणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. तुमचा खोटारडेपणा जनतेला समजला आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होणार

संजय राऊत यांच्यावर नितेश राणे यांनी जोरदार टीका केली. राऊत यांनी महिलांच्या सन्मानाबाबत बोलण्याचा अधिकार नाही. खिचडी चोरांना पैशाची किंमत कळणार नाही. 1500 रुपयांमुळे किती लोकांची दिवाळी गोड झाली ते त्यांना विचारा. परंतु संजय राऊत हे ‘मुंगेरीलाल के हसीना सपने’ पाहत असतात. आता तर त्यांच्या पक्षाला विरोधी पक्षनेता पदही मिळणार नाही. विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होणार आहे. त्याचे नाव 23 तारखेला समजेल. उद्धव ठाकरे म्हणतात, हिंदुत्व कोणाची चूल पेटवत नाही. कारण ते जिहादी सम्राट झालेले आहेत. जेव्हा जेव्हा त्यांच्या तोंडातून हिंदुत्व हा शब्द निघेल तेव्हा त्यांच्या अंगावर गोमूत्र शिंपडावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, गृहमंत्री होण्यापूर्वी तुझे घर संभाळ. मातोश्रीमध्ये एक शकूनी मामा आहे. संजय राऊत हे त्या ठिकाणी शकुनी मामा आहेत. आता सिल्वर ओकचे शकुनी मामा म्हणजे रोहित पवार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.