“राहुल गंदगीला मुळातच सावरकर कळले नाहीत”; भाजपच्या आमदाराची राहुल गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका
ज्यांना स्वतःच्या आजी म्हणजे इंदिरा गांधी काय बोलल्या ते कळलं नाही. त्याला स्वतःच अस्तित्व कळलं नाही त्याला सावरकर काय कळणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
सिंधुदुर्ग : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपने राज्यात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात या यात्रेचे आयोजन केले असून यात्रेच्यावेळी काँग्रेसवर आणि राहुल गांधी यांच्यावर भाजप नेत्यांकडून सडकून टीका केली जात आह. आजही स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काढण्यात आली. यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पातळी सोडून त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते, हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते, विश्वहिंदू परिषद आणि संघ मिळून ही सावरकर यात्रा काढत आहे.
त्यामुळे आमच्यासारख्या असंख्य लोकांना सावरकर यांच्याविषयी गैरसमज होते.ते आजच्या काळात सावरकर यांच्याविषयी वाचल्यानंतर, त्यांच्याबद्दल अभ्यास केल्यानंतर समजून चुकलं आहे की, सावरकर यांच्या एवढा कडवट हिंदू कोणीच असू शकत नाही.
नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांनी राहुल गांधींना गंदगी असा उच्चार कर मुळातच त्यांना सावरकर कळले नाहीत असा टोलाही त्यांना त्यांना लगावला आहे.
ज्यांना स्वतःच्या आजी म्हणजे इंदिरा गांधी काय बोलल्या ते कळलं नाही. त्याला स्वतःच अस्तित्व कळलं नाही त्याला सावरकर काय कळणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधकांनी आम्हाला शिकवू नये. त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी अस म्हंटलय की छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणायची गरज नाही, आणि तेच आम्हाला आता शिकवतात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
ज्यांनी मराठा समाजाच्या मोर्चाला सामनामधून मूक मोर्चा म्हणून हिणवल ते आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज शिकवतात? अशा शब्दात त्यांना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
संभाजी महाराज धर्मवीर नव्हते अस बोलणाऱ्या लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसतात ते लोक आम्हाला महापुरुषांबद्दल मान सन्मान शिकवतात? म्हणजे यांनी चूक केली की स्लिप ऑफ टंग होते,आमच्या नेत्याने चुकून काही बोललं तर शाई फेकली जाते, टीका केली जाते.
यांच्याकडून आम्हाला महापुरुषांबद्दल सर्टिफिकेट मिळवण्याची गरज नसल्याचे सांगत विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला आहे. त्यामुळे हे स्वतःच बरबटलेले आहेत, ते आम्हाला काय शिकवणार अशा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.