Nitesh Rane | ‘तू किती मोठा मर्द आहेस, हे तुझ्या घरातल्यांना…’ नितेश राणेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
Nitesh Rane | "सगळी शासकीय यंत्रणा बाजूला ठेवा. पोलीस बाजूला ठेवा, आम्ही कलानगरमध्ये येतो. तुझी मर्दांनगी बघू, कसा मातोश्रीच्या बाहेर निघतो" अशी आव्हानात्मक भाषा नितेश राणे यांनी केली.
मुंबई : “बाळासाहेबांना प्राण्यांची उपमा देऊन हाक मारायचे. हे मी रामेश्वरची शपथ घेऊन सांगतो. देवेंद्र फडणवीस यांनी रक्ताच्या भावापेक्षा तुला जास्त संभाळलं. तुझे लाड केले” असं नितेश राणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले. “आज मातोश्री 2 मध्ये राहतोस. सामान्य शिवसैनिक, नातेवाईकांना तिथे जाण्याची परवानगी नाही. या मातोश्री 2 ला परवानग्या कोणी दिल्या?”
“महापौरांचा जो बंगला, बाळासाहेबांच्या नावाखाली बळकावला, त्याची परवानगी कोणी दिली?” असे प्रश्न नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले.
…तर महाराष्ट्राची जनता तुला चपलेने मारेल
“2014 ते 2019 मध्ये तुझे लाड फडणवीसांनी पुरवले, तुला संभाळलं” अशी टीका नितेश राणे यांनी केली. “तुझ्या रक्ताचा भाऊ काय बोलतो, त्याची काय अवस्था केली? कधी आमचं तोंड उघडायला लावलस, तर महाराष्ट्राची जनता तुला चपलेने मारेल” अशी टीका नितेश राणे यांनी केली.
‘बाळासाहेबांची औषध वेळेवर दिली नाहीस’
“बाळासाहेबांची औषध वेळेवर दिली नाहीस. खायला दिलं नाहीस. तू मर्दांनगीवर कलंक आहेस. तू किती मोठा मर्द आहेस, हे तुझ्या घरातल्यांना विचार, ते तुला सांगतील” अशी पातळी सोडून नितेश राणेंनी टीका केली. ‘पोलीस बाजूला ठेवा, आम्ही कलानगरमध्ये येतो’
“सगळी शासकीय यंत्रणा बाजूला ठेवा. पोलीस बाजूला ठेवा, आम्ही कलानगरमध्ये येतो. तुझी मर्दांनगी बघू, कसा मातोश्रीच्या बाहेर निघतो, त्यामुळे उगाच आमच्या नेत्यांना नाव ठेवण्याच बंद करा. तुझे कपडे टराटरा फाडण्याची आमची तयारी आहे” असे शब्द नितेश राणे यांनी वापरले.