Nitesh Rane : नितेश राणेंना पुन्हा कोर्टाकडून तारीख पे तारीख, आज हायकोर्टात काय झालं?

नितेश राणे यांना कोर्टासमोर शरण येत. पुन्हा मुंबई हायकोर्टात (High court) जामीनासाठी अर्ज केला, त्यावर आज सुनावणी पार पडली. नितेश राणेंच्या जामीनावर उद्या निर्णय होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Nitesh Rane : नितेश राणेंना पुन्हा कोर्टाकडून तारीख पे तारीख, आज हायकोर्टात काय झालं?
नितेश राणेंच्या जामीनावर उद्या सुनावणी
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 7:17 PM

मुंबई : शिवसैनिक संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack Case) प्रकरणात नितेश राणेंच्या (Nitesh Rane) अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. सध्या नितेश राणे न्यायालयीन कोठडीत आहेत. नितेश राणे यांना कोर्टासमोर शरण येत. पुन्हा मुंबई हायकोर्टात (High court) जामीनासाठी अर्ज केला, त्यावर आज सुनावणी पार पडली. नितेश राणेंच्या जामीनावर उद्या निर्णय होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज कोर्टात युक्तीवादा दरम्यान नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कणकवली न्यायालयात जामीन नाकारल्याची तसेच नितेश यांच्या प्रकृतीची माहिती कोर्टाला दिली. नितेश यांनी अनेकदा पोलीस ठाण्यात येऊन चौकशीला सहकार्य केले आहे. या हल्ल्याचा कट जन आशीर्वाद यात्रेत असे पोलिसीचे म्हणणे आहे मात्र परब यांचा फोटो पाठवला गेला सातपुतेला याचा कोणताही पुरावा नाही, असा युक्तीवाद मानेशिंदे यांनी केला. तसेच संग्राम देसाई यांनी न्यायालयाला नितेश राणे यांच्या दोन दिवसांच्या पोलीस रिमांडची कॉपी सादर केली.

दोन्ही बाजुनी जोरदार युक्तीवाद

यावेळी दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद झाला. वकील सग्राम देसाई म्हणाले की पोलीस जे अनेक मुद्दे सांगत आहेत त्याचा त्यांच्या रिमांड मध्ये उल्लेखही नाही. उदारहणार्थ 7 फोन ची रिकव्हरी करण्याचा, दोन दिवसाच्या रिमंडमध्ये पोलीस काहीही सिद्ध करू शकलेले नाहीत. कट का कधी? कसा आणि का रचला? हे पोलिसांना काढता आले नाही. तसेच जन आशीर्वाद यात्रे वेळचे संदर्भ देऊन न्यायलयाचा वेळ वाया घालवत आहेत असे सतीश मानेशिंदे म्हणाले. तपासातील प्रोग्रेस आणि प्रकरणाचे गांभीर्य पाहून आरोपीना जामीन मिळू नये असा युक्तीवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व आदेशांचे आम्ही पालन केलंय त्यामुळे आम्ही जामिन मिळण्यास पात्र आहोत, असा युक्तीवाद मानेशिंदे यांनी केला.

साक्षीदारांवर दबाव आणू शकतात

नितेश राणे यांच्याकडून साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असे सरकारी वकील म्हणाले. सचिन सातपुते आणि किरण कांबळे या आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने मेरिट ग्राऊंड वर फेटाळले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अजून प्रकरणाचा तपास अपूर्ण आहे , चार्ज शिट फाईल नाही झालीय, अशा परिस्तिथीत तपासावर हॅम्पर्ड येईल, असे मत सरकारी वकीलांनी मांडले. हल्ल्यासाठी वापरलेले शस्त्र हे हल्लेखोरांकडून हस्तगत केले आहेत, तसेच ती विकत घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे, असाही दावा सरकारी वकिलांनी केला. इनोव्हा गाडीने संतोष परब यांच्या मोटर सायकल दिलेली धडक ही हेतूने प्रेरित होती, असेही सांगण्यात आले. सुपारी देऊन हल्ला केला असे मोठे शब्द वापरले गेले. सर्व आरोपींची पोलीस कोठडी मिळूनही चौकशीत कुठेही पैसे दिल्याचा पुरावा सिद्ध करता आला नाही. जुन्या केसस मध्येही जामीनावर असताना कुणा साक्षीदारावर दबाव आणलेला नाही. पोलीस कोठडीत असताना नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांना एकही पुरावा मिळवता आला नाही, अशी बाजू राणेंच्या वकीलांनी मांडली. उद्या कोर्टा राणेंना दिलासा देणार की त्यांचा कोठडी मुक्काम वाढणार हे उद्याच कळेल.

Video : ‘अजित पवारांनी आयुष्यभर जमिनी लाटण्याचं काम केलं’, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप, अजितदादा काय उत्तर देणार?

उत्तर प्रदेश निवडणुकीत वंचितचा समाजवादी पार्टीला पाठिंबा, बसपा आणि भीम आर्मीबद्दल आंबेडकर नेमके काय म्हणाले?

 ज्या काँग्रेसने मुख्यमंत्री केलं, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून शरद पवारांनी स्वतंत्र पक्ष काढला, हे सुप्रिया सुळे विसरल्या का? – राधाकृष्ण विखे पाटील

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.