Jayant Patil | ‘सांगलीत जयंत पाटील, रोहित पाटील यांना सांभाळून घेऊ’, भाजपा खासदाराच मोठं वक्तव्य
Jayant Patil | शरद पवार गटाच्या एक आमदार आणि एका नगर पंचायत सदस्याला संभाळून घेण्याच भाजपा खासदाराच वक्तव्य. हे सगळे संकेत कुठल्या दिशेने ?. या बैठकीचा तपशील अजून समजलेला नाही. त्या बैठकीत काय घडलं? या बद्दल काहीही माहिती नाहीय.
सोलापूर : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी सुरु आहेत, त्यावरुन विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. एक गट अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे. दुसरा गट शरद पवार यांच्यासोबत विरोधी पक्षामध्ये आहे. आमदारांच संख्याबळ अजित पवार गटासोबत आहे. शरद पवार गटाने सोबत यावं, यासाठी अजित पवार आणि भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत.
शनिवारीच पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. कोरेगाव पार्कमध्ये उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही भेट झाल्याची माहिती आहे. जयंत पाटील आणि 2 आमदार या बैठकीला उपस्थित होते अशी माहिती आहे.
पडद्यामागच्या घडामोडींचा अर्थ लावणं खूप कठीण
या बैठकीचा तपशील अजून समजलेला नाही. त्या बैठकीत काय घडलं? या बद्दल काहीही माहिती नाहीय. शरद पवार यांनी अलीकडेच कार्यकर्त्यांना आवाहन केलं. तुम्ही संभ्रमात राहू नका, मी भाजपासोबत जाणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पडद्यामागे ज्या घडामोडी घडतायत, त्याचा नेमका अर्थ लावण खूपच कठीण आहे.
‘गोष्टीचे स्वागत करणे आमचं काम’
दरम्यान सांगलीच्या भाजपा खासदाराने शरद पवार गटाच्या एकआमदार आणि नगर पंचायत सदस्याला संभाळून घेण्याच वक्तव्य केलं आहे. “वरिष्ठ स्तरावर राजकीय हालचाली सुरू आहेत. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. ठरलेल्या गोष्टीचे स्वागत करणे, हेच आमचे काम आहे” असं खासदार संजय काका पाटील म्हणाले. एनडीए बळकट करण्याचा सूचना
“वेट अँड वॉचची आमची भूमिका आहे. महाराष्ट्र आणि गोवा यांच्या बैठकीत भाजपा सोबत एनडीए बळकट करण्याचा सूचना नरेंद्र मोदी यांनी दिल्या” असं ते म्हणाले. “वरिष्ठांनी आदेश दिल्यास आगामी काळात सांगली जिल्हयात जयंत पाटील आणि रोहित पाटील यांना सांभाळून घेऊ” असं खासदार संजय काका पाटील म्हणाले.