भाजप टाकाऊपासून टिकाऊ झाला, कुणी विचारत नव्हतं तेव्हापासून आपल्या कुटुंबाने पक्षाचं काम केलं : प्रीतम मुंडे

भाजप नेत्या आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांसोबत बोलताना भाजप पक्षाच्या राजकीय प्रवासाविषयी भाष्य केलं आहे (BJP MP Pritam Munde says we work for BJP from many years)

भाजप टाकाऊपासून टिकाऊ झाला, कुणी विचारत नव्हतं तेव्हापासून आपल्या कुटुंबाने पक्षाचं काम केलं : प्रीतम मुंडे
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 3:51 PM

बीड : भाजप नेत्या आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांसोबत बोलताना भाजप पक्षाच्या राजकीय प्रवासाविषयी भाष्य केलं आहे. भाजपचा राज्यात टाकाऊपासून टिकाऊपर्यंतचा प्रवास उल्लेखणीय आहे. या प्रवासात सर्व कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनी मेहनत घेतली आहे. त्यामुळेच भाजप हा पक्ष महाराष्ट्रात टिकाऊ झाला आहे, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत. खासदार प्रीतम मुंडे गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्याचा दौरा करत आहेत. त्यांनी आज माजलगावात शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या सक्षम गूळ उद्योगाचे उद्घाटन केले. यावेळी त्या बोलत होत्या (BJP MP Pritam Munde says we work for BJP from many years).

प्रीतम मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

“तुम्ही तुमच्या बोलण्यातून जसं सांगितलं, तुमच्या पूर्वीच्या अनुभवातून तुम्ही ज्या गोष्टी पडलेल्या आहेत त्यांना उभं करण्याचं ट्रेनिंग घेतलं आहे. त्यामुळे टाकाऊपासून टिकाऊ हे तुम्ही शिकलेले आहात. गुळाचा तो उपयोग आहेच, पण भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हतं तेव्हा भाजप पक्षाचं काम आपल्या कुटुंबाने केलंय. त्यावेळी कदाचित समाजात ज्या पक्षाकडे टाकाऊ दृष्टीकोनाने बघत होते. तो पक्ष टिकाऊ झाला आहे. आज सगळ्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये भाजप पक्ष फुललेला दिसत आहे. आपलं भविष्य उज्ज्वल आहे. जसं पक्षाचं भविष्य उज्ज्वल आहे तसंच तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल आहे”, असं खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या (BJP MP Pritam Munde says we work for BJP from many years)

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सगळेच पक्ष आपण जिंकल्याचा दावा करताना दिसत आहेत. यात खासदार प्रीतम मुंडे यांनीही उडी घेत बीड जिल्ह्यात भाजप मुरली असल्याचा दावा केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंडे यांनी जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघींनीही पाठ फिरवली होती. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना अव्वल ठरल्याने मुंडे भगिनींनी विविध जिल्ह्यातील कार्यक्रम आणि उद्घाटनावर भर दिला आहे.

मंत्री धनंजय मुंडे मुंबईत, अन मुंडे भगिनी मतदारसंघात…

कथित बलात्काराच्या आरोप झाल्यापासून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे मुंबईतच आहेत. राज्यातील विरोधकांनी मुंडे यांच्यावर चांगलीच तोफ डागली होती. अशात मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड त्रासात राहिले. काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर मात्र या वादावर अखेरचा पडदा पडला. सध्याही धनंजय मुंडे हे मुंबईतच आहेत आणि अशात पंकजा आणि प्रीतम मुंडे मतदारसंघात शड्डू ठोकून आहेत. तीन दिवसांपासून दोघीही मुंडे भगिनी उद्घाटन आणि भेटीगाठीवर भर दिल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा : पंकजा मुंडेंनी ‘वजन’ कसं घटवलं? वाचा खास टिप्स त्यांच्याकडूनच!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.