AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इंडिया आघाडीची बैठक नव्हे हे तर’… भाजप खासदाराने उडवली खिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास बघण्यासाठी प्रत्येक जण फिरत आहे. मोदींजीं यांनी देशात केलेली कामे यानिमित्ताने त्यांना पहायला मिळेल. मोदींजी यांनी केलेला विकास पाहून निवडणूकीआधीच ते थांबून पाहून घेतील.

'इंडिया आघाडीची बैठक नव्हे हे तर'... भाजप खासदाराने उडवली खिल्ली
PM NARENDRA MODI AND INDIA AGHADI LEADER
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 5:30 PM

अहमदनगर : 30 ऑगस्ट 2023 | देशातील २६ प्रमुख पक्षांची INDIA आघाडीची मुंबईत तिसरी बैठक होत आहे. INDIA आघाडीच्या बैठकीसाठी प्रमुख पक्षांचे नेते मुंबईत दाखल होत आहेत. मात्र, मुंबईत येणाऱ्या या नेत्यांची भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी खिल्ली उडविली. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, समुद्राचे वारं आणि रात्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरणपोळी. असा त्यांचा बेत आहे. हे सगळे पर्यटन असून देशाच्या पर्यटनाला गती देण्याचे काम INDIA आघाडीचे लोक करत आहेत अशी टीका त्यांनी केली.

छोट्या गोष्टींवर चर्चा कशाला?

राज्य मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीतून भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वगळण्यात आले. त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यावर बोलताना सुजय विखे म्हणाले, ‘आठ सीटर गाडी असली तर कुणीतरी उतरल्याशिवाय कुणी त्यात बसू शकत नाही.’

हे सुद्धा वाचा

‘भाजपने राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा मानसन्मान आणि मंत्रिपद दिले आहे. त्यामुळे छोट्या गोष्टींवर चर्चा कशाला? हा फार मोठा विषय नाही. पक्षाचा आदेश अंतिम असतो. आम्ही तीन पक्ष म्हणजे एक कुटुंब आहोत. ते समितीत असल्याचे मला माहीत नव्हते आज बातम्या ऐकून ही माहिती कळली’, असे ते म्हणाले.

कारखान्याची अडचण आता तरी दुर व्हावी

राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. ते पाहूनच अजितदादा यांनी तो निर्णय घेतला होता. राज्यशासन फक्त कर्जाची हमी देते, पैसे देत नाही. कर्ज एनसिडीसीच्या माध्यमातून केंद्र सरकार उपलब्ध करून देते. अडचणीत असलेले कारखाने योगायोगाने भाजपच्या लोकांचे आहेत. मविआने तीन वर्षे अन्याय केला म्हणून आम्ही अडचणीत आलो होतो. पण, गेल्या तीन वर्षांची अडचण आता तरी दूर व्हावी यासाठी काम चालू आहे. यात कुठलाही पक्षपातीपणा होणार नाही, असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

लोकसभेत गडाख – विखे सामना?

आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी आणि अहमदनगर लोकसभेत जो मोदींजींचा फोटो वापरेल तोच खासदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. येथे उद्धव ठाकरे उमेदवार देणार असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा. उद्धव ठाकरे यांना सर्व ठिकाणी जागा देण्याचा अधिकार आहे. पण, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने अद्याप तिकीट जाहीर केले नाही. त्यामुळे कुणासोबत सामना होणार हे माझे तिकीट फायनल झाल्यावरच ठरेल असे त्यांनी सांगितले.

बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन.
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?
महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?.
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन.
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.