Rahul Gandhi : वातावरण तापलं, राहुल गांधींनी कोल्हापुरात पाऊल ठेवताच भाजपा कार्यकर्ते धावले

Rahul Gandhi : कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी आज कोल्हापुरात आले आहेत. भाजपा कार्यकर्ते सुद्धा राहुल गांधी ज्या मार्गावरुन जाणार तिथे जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. पोलीस या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत.

Rahul Gandhi : वातावरण तापलं, राहुल गांधींनी कोल्हापुरात पाऊल ठेवताच भाजपा कार्यकर्ते धावले
Bjp protest
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 11:35 AM

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज कोल्हापुरा दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी जवळपास 14 वर्षांनी कोल्हापुरमध्ये आले आहेत. राहुल गांधी यांनी कोल्हापुरमध्ये पाय ठेवताच भाजपा कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणारच असा या भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. शनिवारी सकाळी राहुल गांधी कोल्हापुरमध्ये दाखल झाले. एका सामान्य टेम्पो चालकाच्या घरी राहुल गांधी यांनी चहापान केलं. राहुल गांधी कोल्हापुरात आल्यानंतर भाजपा कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर काळे झेंडे घेऊन जमले.

राहुल गांधी यांच्या वाहनांचा ताफा ज्या मार्गावरुन जाणार आहे, त्या दिशेने काळे झेंडे दाखवण्यासाठी भाजपा कार्यकर्ते धावत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. भाजपा कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. राहुल गांधी अलीकडे आरक्षण आणि संविधानासंदर्भात काही वक्तव्य केली आहेत. त्या विरोधात निषेध म्हणून आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवणार असं भाजपा कार्यकर्त्यांच म्हणणं आहे.

येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.