राज्यभरात भाजप आक्रमक, राहुल गांधी अन् बॅनर्जीविरोधात आंदोलन

Rahul Gandhi and bjp protest in maharashtra | तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांची मिमिक्री संसदेच्या पायऱ्यांवर केली. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात भाजपकडून आंदोलन करण्यात आले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापुरात आंदोलन झाले.

राज्यभरात भाजप आक्रमक, राहुल गांधी अन् बॅनर्जीविरोधात आंदोलन
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 2:26 PM

मुंबई, दि.21 डिसेंबर | लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संसद भवन परिसरात आंदोलन करताना तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याबाबत मिमिक्री केली. घटनात्मक पदावरील व्यक्तीबाबत असभ्य व अशोभनीय वर्तन केलेत्याचवेळी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी व्हिडिओ करत होते. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहे. गुरुवारी भाजपकडून या घटनेचा निषेध करण्यात. राज्यभर आंदोलन करण्यात आले.

भिवंडीत शहराध्यक्ष अँड हर्षल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यालयाबाहेर तीव्र निषेध आंदोलने करण्यात आले .या आंदोलनात मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते. त्यांनी राहुल गांधी व तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या बॅनरवर जोडे मारत निषेध केला.

सांगली, छत्रपती संभाजीनगरात आंदोलन

तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने उपराष्ट्रपतींची मिमिक्री केली. त्यानंतर भारतीय जनता पार्टी राज्यभर आक्रमक झालेली आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील क्रांती चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी तृणमूल काँग्रेस, राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या बद्दल करण्यात आलेल्या मिमिक्रीचे पडसाद सांगलीमध्येही उमटले आहेत. संतप्त भाजपाच्यावतीने तृणमूल काँग्रेसचे खासदार बॅनर्जी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. भाजप कार्यालयासमोर संतप्त भाजपा कार्यकर्त्यांकडून खासदार बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्याकडून उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांचा आपमान केल्याचा निषेध म्हणून जोरदार निदर्शने करत घोषणाबाजीही करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

सोलापूर, कोल्हापुरात बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने

संसदेबाहेर उपराष्ट्रपतींची मिमिक्री करणाऱ्या खासदारांविरोधात भाजपकडून सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. खासदार कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधीविरोधात सोलापुरात भाजप आक्रमक झाली. कोल्हापुरात भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये भाजपने निदर्शने केली. नाशिकमध्ये राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. यावेळी इंडिया आघाडीने माफी मागवी, अशी मागणी करण्यात आली. धुळे तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी धुळे ते नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.