कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी BJPने दोन नावं दिल्लीला पाठवली, पण पसंती सत्यजीत कदमांना

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दोन नावं दिल्लीला पाठवण्यात आल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. दिल्लीला नाव पाठवत असताना दोन नाव पाठवायचे असतात. यातून कुठलं नाव घ्यावं असं आम्हाला वाटतं असं कळवायचं असतं.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी BJPने दोन नावं दिल्लीला पाठवली, पण पसंती सत्यजीत कदमांना
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी BJPने दोन नावं दिल्लीला पाठवलीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 2:10 PM

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दोन नावं दिल्लीला पाठवण्यात आल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी सांगितलं. दिल्लीला नाव पाठवत असताना दोन नाव पाठवायचे असतात. यातून कुठलं नाव घ्यावं असं आम्हाला वाटतं असं कळवायचं असतं. पण निर्णय दिल्लीला करायचा असतो. दहा नाव पाठवायची नसतात. दोनच नावं पाठवायची असतात. दिल्ली त्यावर विचारते तुम्हाला कोणतं नाव हवंय. पण निर्णय दिल्लीचे नेतेच करतात. त्यामुळे निर्णय झाला नाही. निर्णय रात्री होणाऱ्या पार्लमेंट्री बोर्डात होईल. सत्यजित कदम (styajit kadam) आणि महेश जाधव (mahesh jadhav) यांचं नाव पाठवलं आहे. सत्यजीत कदम यांचं नाव फायनल व्हावं असं आमचं म्हणणं आहे. त्यावर आमचं एकमत झालं आहे. पण निर्णय रात्री दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डात त्यावर निर्णय होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी गप्पा मारल्या. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून पाटील यांनी आघाडी सरकारवर टीका केली. मलिकांचा मंत्रिमंडळात ठेवणं हा अट्टाहास आहे. लोकशाहीची थट्टा आहे. मलिकांचा राजीनामा घेत नाहीत. मग अनिल देशमुख आणि राठोड यांचा राजीनामा कसा घेतला? विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, अशी टीका पाटील यांनी केली.

डोक्यात सत्तेची हवा

भाजपला सत्तेत येऊ देणार नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. युद्ध सुरू होईल तेव्हा बघू. गरजेल तो पडेल काय? भाजपकडून काही तरी शिका असा सल्ला त्यांनी आमदारांना दिला आहे. म्हणजे भाजपकडून काही शिकण्यासारखे आहे हे पवारांनी सुद्धा मान्य केलं आहे, असं ते म्हणाले. आरोप प्रत्यारोप मिटवण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला पाहिजे. अपघाताने सत्ता येऊन देखील त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

तर शेट्टींचं भाजपमध्ये स्वागतच

भाजपची काही ध्येय धोरणं राजू शेट्टींना पटली नव्हती. त्यावर चर्चा करू. पण मोदींवर टीका करू नका अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. पण ते बाहेर पडले. महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी महाविकास आघाडी सोडली आणि भाजपसोबत येण्याचा विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांवर बोलायचं नाही, त्यांना लई मोठं केलं; Chandrakant Patil यांचा टोला

महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी अडीच वर्षे थांबावे लागेल, भुजबळांचा Fadnavis यांना टोला

Holi Festival : “महापालिका निवडणुकीत आम्ही आमचे रंग दाखवू!”, एकनाथ शिंदेंचा होळीच्या दिवशी एल्गार

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.