चर्चा तर होणारच: विधिमंडळात घमासान; सभागृहाबाहेर दोस्ती, नार्वेकर-शेलारांचे काय रंगले गुफ्तगू?

नार्वेकर आणि शेलार यांच्यामध्ये काही साटेलोटे झाले असेल का, ते माहिती नाही. काही राजकीय खेळीवर मंथन. कारण येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यात शेलार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने काही बोलणी झाली असेल का, काहीही असू शकते. मात्र...

चर्चा तर होणारच: विधिमंडळात घमासान; सभागृहाबाहेर दोस्ती, नार्वेकर-शेलारांचे काय रंगले गुफ्तगू?
विधिमंडळाबाहेर मिलिंद नार्वेकर आणि आशिष शेलार यांची चर्चा रंगली.
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 3:00 PM

मुंबईः भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) या दोन्ही पक्षांमध्ये रंगलेला कलगीतुरा उभा महाराष्ट्र पाहतोय. किरीट सोमय्यांनी केलेले आरोप. या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट मातोश्री बाहेर पत्रकार परिषद घेऊन दिलेले उत्तर. त्यानंतर रंगलेली खडाजंगी. या दोन्ही पक्षाचे मुख्य नेते आपल्याकडे समोरच्याची कुंडली आहेत, असा दावा करतायत. भाजपचे नेते म्हणतात हे मंत्री तुरुंगात जाणार असे म्हणतात. तर शिवसेनेचे नेते, भाजपचे पिता-पुत्र जेलची हवा खाणार म्हणतात. या पार्श्वभूमीवर दुसरीकडे आज गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाबाहेर भाजप आणि सभागृहाच्या आत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मात्र, विधिमंडळाच्या बाहेर भाजप नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यात अशी काही चर्चा रंगली की, कोणालाही वाटेल, हे राजकीय आरोप-प्रत्यारोप केवळ नाटक आहे. खरेच तसे तर नाही ना?

काय झाली चर्चा?

विधिमंडळाच्या बाहेर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात चांगलीच चर्चा रंगली. दोघे गंभीरपणे, तर कधी एकदम रिलॅक्स होऊन चर्चा करताना दिसले. त्यांच्या गप्पा सुरू असताना अनेक जण त्यांच्या सभोवताली घुटमळत होते. तिथे उपस्थितांनाही त्यांच्या या चर्चेने आश्चर्याचा धक्का बसला नसला, तर नवलच म्हणावे लागेल. मात्र, हे नवल घडले. ते माध्यमांच्या कॅमेऱ्यानेही आपसुक टिपले. खरेच ही चर्चा कोणाला खिंडीत गाठायचे आणि कोणाला सोडायचे यासाठी होती की, पुढील काही खासगी नियोजन. काहीही असो. चर्चा रंगली.

काही साटेलोटे झाले का?

नार्वेकर आणि शेलार यांच्यामध्ये काही साटेलोटे झाले असेल का, ते माहिती नाही. काही राजकीय खेळीवर मंथन. कारण येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यात शेलार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने काही बोलणी झाली असेल का, काहीही असू शकते. मात्र, भाजप नेते नारायण राणे ज्यांना लक्ष करतात त्या नार्वेकरांसोबत शेलारांची रंगलेली चर्चा आजच्या दिवसाचे आकर्षण ठरली. यातून काही फलित निघते का, हे काळच सांगेल.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.