इंदुरीकर महाराजांचा वाढदिवस सोहळा, सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते एकाच रथात

निवृत्ती महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील आणि सत्यजित तांबे यांनी हजेरी लावली होती.

इंदुरीकर महाराजांचा वाढदिवस सोहळा, सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते एकाच रथात
Follow us
| Updated on: Jan 27, 2020 | 8:14 AM

अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा वाढदिवस सोहळा रविवारी संगमनेरच्या ओझर गावात पार पाडला. यावेळी निवृत्ती महाराजांची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे निवृत्ती महाराज ज्या रथात होते त्याच रथात सर्वपक्षीय नेते देखील बसले होते.

निवृत्ती महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील आणि सत्यजित तांबे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर रोहित पवार यांनी फेसबुकवर या कार्यक्रमाची माहिती दिली.

“इंदुरीकर महाराज हे आपलं भूषण असून संत परंपरेचा वारसा ते आपल्या किर्तन सेवेच्या माध्यमातून पुढे घेऊन जात आहेत. समाजातील अंधश्रद्धा दूर करुन शिक्षणाचं प्रमाण वाढावं आणि समाजात प्रेम, आपुलकी, एकोपा निर्माण करण्यासोबतच लोकांच्या मनातील द्वेषाची जळमटं दूर करण्याचं काम आपल्या स्वतंत्र शैलीने ते करत आहेत. केवळ उपदेशाचे डोस न पाजता आधी स्वतः सामाजिक कामाचा आदर्श त्यांनी निर्माण केलाय. त्यांच्या संस्थेत अनेक अनाथ, गरीब मुलं आज मोफत शिक्षण घेतात, ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे”, असे रोहत पवार म्हणाले.

“वाढदिवसानिमित्त रथातून काढण्यात आलेल्या त्यांच्या मिरवणुकीत माझ्यासारख्या कार्यकर्त्यासह अन्य राजकीय मंडळींनाही त्यांनी स्थान दिलं. यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा समाज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोटला होता. ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या विद्यार्थ्यांचं वार्षिक स्नेहसंमेल आणि पारितोषिक वितरण समारंभही यावेळी झाला. महाराजांच्या वाढदिवसानिमित्त इथं काही संत मंडळींचाही मला सहवास मिळाला”, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.