भाजपच्या प्रवक्त्याने पुन्हा मर्यादा ओलांडली, म्हणाले “आम्हाला दाभोळकरांचे संस्कार नको”
आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही......." असे वादग्रस्त ट्विटर अवधूत वाघ यांनी ट्विट केले. (avdhut wagh narayan dabhadkar narendra dabholkar)
मुंबई : उपचारासाठी बेड मिळावा यासाठी नागपुरातील 85 वर्षीय भाऊराव दाभाडकर ( Narayan Dabhadkar) यांनी एका तरुणासाठी आपला बेड सोडला. त्यानंतर दोन दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ (Avdhut Wagh) यांनी “आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही…….” असे वादग्रस्त ट्विट केले. त्यांच्या या ट्विटनंतर राज्यात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. (BJP spokesperson Avdhut Wagh given contradictory statment on twitter said we want culture of Narayan Dabhadkar not Narendra Dabholkar)
नेमके प्रकरण काय आहे ?
तरुणाला बेड मिळावा यासाठी 85 वर्षीय भाऊराव दाभाडकर यांनी स्वत:चा बेड सोडला. त्यानंतर पुढील दोन दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दाभाडकरांचे सर्व होऊ लागले. त्यांच्या समर्पणामुळे अनेकजण भाराऊन गेले. दाभाडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे भाजप आणि आरएसएसच्या अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समर्पणामुळे त्यांना नमन केले. याच कारणामुळे दाभाडकर यांची मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावरसुद्धा चर्चा सुरु आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी आम्हाला दाभाडकर यांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नव्हे, असे त्यांनी म्हटले आहे.
आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही…….
— Avadhut Wagh अवधूत वाघ (@Avadhutwaghbjp) April 29, 2021
… आणि दाभाडकर यांनी बेड सोडला
नागपुरात राहणाऱ्या 85 वर्षीय नारायण दाभाडकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. त्यांची ऑक्सिजन लेव्हल 60 पर्यंत पोहोचली होती. मुलगी आणि जावयाने तिला इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. बऱ्याच वेळानंतर त्यांना बेड मिळाला. त्याचवेळी एक महिला आपल्या 40 वर्षीय पतीला वाचवण्यासाठी बेड शोधत असल्याचं त्यांना समजलं. मात्र बेडअभावी रुग्णालयाने त्यांना दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. रडणाऱ्या महिलेला पाहून दाभाडकरांना पाझर फुटला. त्यानंतर त्यांनी आपला बेड तरुणावर उपचार करण्यासाठी सोडला.
शिवराजसिंह चौहानांकडून कौतुक
नारायण दाभाडकर हे आरएसएसचे स्वयंसेवक होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही त्यांच्या त्यागाचं कौतुक करत मानवंदना दिली आहे.
बेड स्वेच्छेने सोडत असल्याचं पत्र
“मी 85 वर्षांचा झालोय, आयुष्याचा भरभरुन उपभोग घेतला, जर त्या महिलेच्या पतीचे निधन झाले, तर तिची मुलं अनाथ होतील. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य आहे” अशा भावना दाभाडकरांनी व्यक्त केल्या. मी माझा बेड स्वेच्छेने दुसऱ्या रुग्णासाठी सोडत आहे, असे पत्र त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. दाभाडकर घरी परतले, मात्र तीनच दिवसात राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
इतर बातम्या :
विद्यार्थीदशेतच तबला वाजवण्याचा छंद जडला, वर्गातही बाकं वाजवायचे; वाचा, दत्ता शिंदेंचे किस्से
Assam Exit Poll Result 2021 | आसाम विधानसभा निवडणुकीत NDA आणि UPA मध्ये कांटे की टक्कर
(BJP spokesperson Avdhut Wagh given contradictory statment on twitter said we want culture of Narayan Dabhadkar not Narendra Dabholkar)