उद्धव ठाकरेंबरोबर भविष्यात चारच लोक दिसतील, भाजपच्या बड्या नेत्याने निशाणा साधला

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाणे म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देण्याचा प्रकार होता अशी जोरदार टीका भाजपकडून केली गेला आहे.

उद्धव ठाकरेंबरोबर भविष्यात चारच लोक दिसतील, भाजपच्या बड्या नेत्याने निशाणा साधला
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 4:14 PM

सांगली: सुषमा आधारे यांचे पती शिंदे गटात गेल्यनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने काँग्रेस-राष्ट्रवादीचा विचार घेऊन काम करत आहे. ते पाहता त्यांच्यावर त्यांच्या व्यासपीठावर चौघेच बसण्याची वेळ भविष्यात निर्माण होणार अशी टीका बावनकुळे यांनी केली. सांगलीमध्ये बावनकुळे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या गटातील लोक शिंदे गटात सामील होत आहेत. हे पाहिले तर भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या स्टेजवर चौघेच लोक असतील असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला।

एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बंडखोरी करुन भाजपसोबत शिंदे गटाने सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपनेही उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हिंदुत्वाच्या अनेक मुद्यावरुन उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य केले जात आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही युती होऊच शकत नाही असा टोला वेळोवेळी लगावलाही जातो. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटावर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्यावर अशी परिस्थिती येणार आहे की, त्यांच्या स्टेजवर केवळ चारच लोक दिसणार आहेत असा जोरदार हल्लाबोल भाजपकडून करण्यात आला आहे.

या टीकेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे गट भिडणार असल्याचे दिसून येत आहे. बावनकुळे यांनी टीका केल्यामुळे हा वाद पुन्हा रंगणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता असा दावा केला आहे की, उद्धव ठाकरे गटाबरोबर त्यांच्या पक्षातील काही मोजकीच माणसं त्यांच्यासोबत राहतील. त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्टेजवर केवळ चारच लोकं दिसतील अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीने ज्यावेळी एकत्र मिळून सत्ता स्थापन केली. तेव्हापासून भाजपकडून वारंवार शिवसेनेवर आणि त्यांच्या हिदुत्वावर जोरदार टीका केली जात होती.

त्यामुळेच यावेळीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटावर टीका करताना ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतची साथ म्हणजे शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या विचाराला मूठमाती देण्यचा प्रकार आहे. हे अनेकवेळा उद्धव ठाकरेना आम्ही सांगितलं असंही बावनकुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...