“लाडकी बहीणपाठोपाठ लाडका शेतकरी भाऊ योजना आणा अन् शेतकऱ्याला…”, भाजप पुरस्कृत आमदाराची मुख्यमंत्र्यांना साद

शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी व्हावी आणि त्यांचा साताबारा सरसकट कोरा व्हावा, अशी मागणी आम्ही करणार आहोत", असे बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटले.

लाडकी बहीणपाठोपाठ लाडका शेतकरी भाऊ योजना आणा अन् शेतकऱ्याला..., भाजप पुरस्कृत आमदाराची मुख्यमंत्र्यांना साद
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 8:38 AM

Rajendra Raut demand Farmer Loan Waiver scheme : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. त्यातच आता राज्य सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना खूश करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना १५०० रुपये मिळणार आहेत. त्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात यावी, अशी मागणी बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. त्याचप्रमाणे लाडका शेतकरी भाऊ अशी योजना आणावी आणि या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना राजेंद्र राऊत यांनी ही मागणी केली आहे.

राजेंद्र राऊत काय म्हणाले?

“राज्य सरकारने लाडकी बहीण, बेरोजगारांना रोजगाराची संधी असे अनेक चांगले निर्णय घेतले आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी सातत्याने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने लाडकी बहीण पाठोपाठ लाडका शेतकरी भाऊ ही योजना सुरु करावी. या योजनेतंर्गत सर्व शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी व्हावी, अशी अनेक शेतकऱ्यांची भावना आहे. या भावनेची कदर करुन निश्चितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना आम्ही तिन्ही गटाचे आमदार एकत्रित पत्र देणार आहोत. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी व्हावी आणि त्यांचा साताबारा सरसकट कोरा व्हावा, अशी मागणी आम्ही करणार आहोत”, असे बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटले.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची घोषणा

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची घोषणा होत आहे. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेतंर्गत महिलांना १५०० दर महिना दिले जाणार आहे. त्यासोबतच तरुणांसाठी लाडका भाऊ ही योजना सुरु केली आहे. त्याद्वारे बारावी पास तरुणांना दरमहा 6 हजार रुपये, आयटीआय आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना 10 हजार रुपये मिळणार आहे.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...