शरद पवार गटाचा सुरुंग, भाजपचा सावरण्याचा अतोनात प्रयत्न, कागलमध्ये काय घडतंय?

कोल्हापुरात नव्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळतायत. कागलचे समरजीत घाटगे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे भाजपकडून समरजीत घाटगे यांच्या मनधरणीचे प्रचंड प्रयत्न केले जात आहेत.

शरद पवार गटाचा सुरुंग, भाजपचा सावरण्याचा अतोनात प्रयत्न, कागलमध्ये काय घडतंय?
शरद पवारांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Aug 21, 2024 | 10:50 PM

कोल्हापुरात मोठा राजकीय ड्रामा बघायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ हे कागलचे विद्यमान आमदार असल्यामुळे आगामी निवडणुकीत आपल्याला या जागेवर महायुतीचं तिकीट मिळणार नाही, या विचाराने भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा लवकरच शरद पवार गटाच प्रवेश देखील होणार असल्याची बातमी आहे. असं असताना आता भाजपकडून शरद पवार गटाने लावलेला सुरुंग भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजपकडून समरजीत घाटगे यांची मनधरणी प्रकरण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

समरजीत घाटगे यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे धनंजय महाडिक घाटगे यांच्या घरी पोहचले आहेत. घाटगे यांनी भाजप पक्ष सोडू नये ही विनंती करण्यासाठी धनंजय महाडिक पोहोचले आहेत. धनंजय महाडिक यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, सत्यजित कदमही उपस्थित आहेत. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. महाडिक यांना समरजीत घाटगे यांची मनधरणी करण्यात कितपत यश येतं? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

समरजीत घाटगे यांचं सूचक ट्विट

भाजपचे समरजीत घाटगे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महायुतीत विद्यमान आमदारांच्या जागा त्याच पक्षांना जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे कोल्हापूरच्या कागल विधानसभेत यंदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजीत घाटगे यांच्यात सामना होऊ शकतो. “साथ जनतेची…साथ आपल्या माणसांची.. चला.. परिवर्तन घडवूया…”, असं ट्विट करत घाटगेंनी तसे संकेतही दिले आहेत.

काय घडणार?

येत्या 23 ऑगस्टला शाहू सहकारी साखर कारखान्यात एक कार्यक्रम होणार आहे. त्यात समर्थकांसोबतच्या चर्चेनंतर अंतिम निर्णयाची शक्यता आहे. याशिवाय कोल्हापुरातल्या महायुतीच्या सभेलाही घाटगे अनुपस्थित असणार आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या गटात घाटगेंचा प्रवेश निश्चित मानला जातोय. गेल्या काही दिवसात सुप्रिया सुळेंसह स्वतः शरद पवार घाटगेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळालीय. समरजीत घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे समर्थक मानले जातात. मात्र जर त्यांनीच हाती तुतारी धरल्यास फडणवीसांसाठी हा धक्का असेल.

“समरजित घाडगेंनी विधानसभेसाठी मेहनत घेतली म्हणून त्यांनी निर्णय घेतला असावा मी त्यांच्याशी बोलणार आहे, असा निर्णय घेऊ नये, माझ देवेंद्र फडणवीसांशीही याविषयी बोलण झाल आहे. संघटनात्मक बदल झाल्यामुळे त्यांच पद गेलं आहे. त्यामुळे राजीनामा दिला असावा”, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिलीय.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?

भाजपात असले तरी कागल विधानसभेत 2019 ला समरजीत घाटगे अपक्ष लढले. कारण युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला सुटली होती. पण अपक्ष लढूनही दुसऱ्या क्रमांकाची मतं घेत मुश्रीफांचा 28 हजार मतांनी विजय झाला होता. मुश्रीफांना 1 लाख 16 हजार 436, अपक्ष लढलेल्या घाटगेंना 88 हजार 303, तर शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगेंना 55 हजार 657 मतं पडली होती.

2019 ला भाजपनं 105 आमदार जिंकले असले, तरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या १० विधानसभेत भाजपला खातंही उघडता आलेलं नव्हतं. काही ठिकाणी भाजपचे बंडखोर उभे राहिले. मात्र त्याचा फटका शिवसेना उमेदवारांना बसला होता. त्यात गेल्या अनेक वर्षांपासून तयारीत असलेल्या समरजीत घाटगेंना यंदा भाजपच्या तिकीटाचे वेध होते. पण अजित पवारांचा गट सत्तेत आल्यामुळे ती सुद्धा आशा मावळली, म्हणून आता समरजीत घाटगे हाती तुतारी घेणार असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.