Assembly Elections 2024: जागा वाटपानंतरही भाजप आपल्या उमेदवारांना मित्रपक्षांकडून लढवणार? भाजपच्या खेळीने…

जागा वाटपानंतर भाजप आपले काही उमेदवार मित्र पक्षांच्या चिन्हावर लढवणार असल्याची चर्चा आहे. लोकसभेत भाजपने हाच फॉर्मूला वापरला होता. आता विधानसभेतही हेच सूत्र वापरणार असल्यामुळे मित्रपक्षांनी जागा जास्त दिसणार असल्या तरी काही ठिकाणी भाजप उमेदवार लढणार आहे.

Assembly Elections 2024: जागा वाटपानंतरही भाजप आपल्या उमेदवारांना मित्रपक्षांकडून लढवणार? भाजपच्या खेळीने...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीरImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 10:59 AM

विधानसभा निवडणूक जाहीर होताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. त्यापूर्वी महायुतीमधील भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महायुतीमधील १५५ ते १६० जागा भाजप लढवणार असल्याची चर्चा आहे. शिंदे यांची शिवसेना ७५ ते ८० आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी ५० ते ५५ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु या जागा वाटपानंतर भाजप आपले काही उमेदवार मित्र पक्षांच्या चिन्हावर लढवणार असल्याची चर्चा आहे. लोकसभेत भाजपने हाच फॉर्मूला वापरला होता. आता विधानसभेतही हेच सूत्र वापरणार असल्यामुळे मित्रपक्षांनी जागा जास्त दिसणार असल्या तरी काही ठिकाणी भाजप उमेदवार लढणार आहे.

राजहंस सिंग, निलेश राणे शिंदे सेनेतर्फे लढणार

भाजपचे विधान परिषदेचे सदस्य राजहंस सिंग यांचे डिंडोशीवर लक्ष केंद्रीत केले आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सिंग हे डिंडोशी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. जिथे त्यांनी २००९ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली होती. तसेच निलेश राणे शिंदे सेनेकडून निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे म्हटले जात आहे.

भाजपने नितेश राणे यांना कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. नारायण राणे खासदार आहेत. आता नारायण राणे यांचा दुसरा मुलगा निलेश राणे यांनाही तिकीट हवे आहे. परंतु ते भाजपऐवजी शिंदेसेनेकडून मैदानात उतरणार आहे. निलेश राणे 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत.

हे सुद्धा वाचा

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ या दोन मतदारसंघांमध्ये भाजपचे कार्यकर्ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होणार आहे. यामुळे या दोन्ही दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे.

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती शिंदे सेनेचे उमेदवार

दरम्यान, शिंदे सेनेकडून आदित्य ठाकरे यांचे माजी निकटवर्ती राहुल कनाल यांनाही उमेदवारी दिली जाणार आहे. ते श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. त्यांचा कालिना मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय पोटणीस यांच्याशी थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Non Stop LIVE Update
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.