प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या जालनाच्या मंठा तालुक्यातील ग्रामपंचायतीत भाजपचे वर्चस्व
अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पाटोदा तालुका मंठा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे (BJP win in borade patoda gram panchayat).
जालना : अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पाटोदा तालुका मंठा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे. माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दणदणीत विजय संपादन करण्यात आला आहे. सरपंचपदी दिपाली अशोक बोराडे तर उपसरपंचपदी पंजाबराव बोराडे यांची निवड झाली आहे, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे (BJP win in borade patoda gram panchayat)
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसांच्या मूळ गावांमध्ये भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा मुसंडी मारली असून माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विकास कामाची पावती असल्याचे पंजाब बोराडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पुढे या पत्रकात म्हटले आहे की, “गेल्या पाच सहा वर्षांमध्ये पाटोदा गावाचा विकासामध्ये आम्ही मोलाची भर घातली. यामुळे विजय झाला. हा विजय जनतेचा विजय असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.” त्याचबरोबर यापुढेही माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर आणि युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा गावचा विकास करण्याचा मानस असल्याचे बोराडे यांनी म्हटले आहे (BJP win in borade patoda gram panchayat).