MLC Election result 2022 : विधान परिषद निवडणुकीत भाजपचे 4, तर महाविकास आघाडीचे 5 उमेदवार विजयी; एका जागेच्या निकालाकडे राज्याचं लक्ष

पेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या भाई जगताप आणि भाजपाच्या प्रसाद लाड यांच्यात चुरशीची लढत सुरु होती. मात्र अखेरच्या टप्प्यात भाजपाचे प्रसाद लाड यांनी भाई जगताप यांच्यावर मात करत विजय मिळवला आहे.

MLC Election result 2022 : विधान परिषद निवडणुकीत भाजपचे 4, तर महाविकास आघाडीचे 5 उमेदवार विजयी; एका जागेच्या निकालाकडे राज्याचं लक्ष
विधान परिषद निवडणूक निकालImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 10:26 PM

मुंबई : विधान परिषद निवडणुकीचा (Vidhan Parishad Election) निकाल लागलाय. यात पहिल्या पसंतीच्या मतांनुसार महाविकास आघाडीचे पाच तर भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहे. तर एका जागेचा निकाल येणं अद्याप बाकी आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे या निवडणुकीतही चुरस पाहायला मिळाली. सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या संख्याबळ पाहिलं तर महाविकास आघाडीचे पाच आणि भाजपचे चार उमेदवार निवडून येणार हे निश्चित होतं. पण 10 व्या जागेवर भाजपचे प्रसाद लाड (Prasad Lad) आणि काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यात कोण विजयी होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

विजयी कोण, किती मते?

शिवसेना

>> आमशा पाडवी – विजयी -26

>> सचिन अहिर- विजयी – 26

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी काँग्रेस

>> एकनाथ खडसे -विजयी-27

>> रामराजे नाईाक निंबाळकर -विजयी- 26

भाजपा

>> प्रवीण दरेकर – विजयी- 26

>> राम शिंदे – विजयी- 26

>> श्रीकांत भारतीय- विजयी- 26

>> उमा खापरे – विजयी 26

>> प्रसाद लाड – (निकाल येणे बाकी)

काँग्रेस

>> चंद्रकातं हंडोरे – विजयी – 26

>> भाई जगताप- (निकाल येणे बाकी)

अजित पवार विरुद्ध  देवेंद्र फडणवीस सामना

या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा आत्मविश्वास राज्यसभेतील विजयानंतर वाढलेला होता. त्यातच भाजपाने चारऐवजी पाच उमेदवार विधान परिषदेला दिले होते. फडणवीसांचे हे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले होते. अजित पवार यांनी या निवडणुकीत जातीनं लक्ष घातलं होतं. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सामना मानला गेला.

राज्यसभेनंतर विधान परिषदेतही फडणवीसांचा दे धक्का?

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले होते. भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला. तर शिवसेनेचे संजय पवार यांना पराभव पत्करावा लागला. त्यावेळी फडणवीसांची रणनिती यशस्वी ठरल्याचं खुद्द पवारांनीही मान्य केलं होतं. त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीतही फडणवीसांची रणनिती यशस्वी ठरणार का? फडणवीस पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देणार का? हे दहाव्या जागेच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.