मुंबई : विधान परिषद निवडणुकीचा (Vidhan Parishad Election) निकाल लागलाय. यात पहिल्या पसंतीच्या मतांनुसार महाविकास आघाडीचे पाच तर भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहे. तर एका जागेचा निकाल येणं अद्याप बाकी आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे या निवडणुकीतही चुरस पाहायला मिळाली. सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या संख्याबळ पाहिलं तर महाविकास आघाडीचे पाच आणि भाजपचे चार उमेदवार निवडून येणार हे निश्चित होतं. पण 10 व्या जागेवर भाजपचे प्रसाद लाड (Prasad Lad) आणि काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यात कोण विजयी होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
>> आमशा पाडवी – विजयी -26
>> सचिन अहिर- विजयी – 26
>> एकनाथ खडसे -विजयी-27
>> रामराजे नाईाक निंबाळकर -विजयी- 26
>> प्रवीण दरेकर – विजयी- 26
>> राम शिंदे – विजयी- 26
>> श्रीकांत भारतीय- विजयी- 26
>> उमा खापरे – विजयी 26
>> प्रसाद लाड – (निकाल येणे बाकी)
>> चंद्रकातं हंडोरे – विजयी – 26
>> भाई जगताप- (निकाल येणे बाकी)
या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा आत्मविश्वास राज्यसभेतील विजयानंतर वाढलेला होता. त्यातच भाजपाने चारऐवजी पाच उमेदवार विधान परिषदेला दिले होते. फडणवीसांचे हे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले होते. अजित पवार यांनी या निवडणुकीत जातीनं लक्ष घातलं होतं. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सामना मानला गेला.
राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले होते. भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला. तर शिवसेनेचे संजय पवार यांना पराभव पत्करावा लागला. त्यावेळी फडणवीसांची रणनिती यशस्वी ठरल्याचं खुद्द पवारांनीही मान्य केलं होतं. त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीतही फडणवीसांची रणनिती यशस्वी ठरणार का? फडणवीस पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देणार का? हे दहाव्या जागेच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.