भाजपचा ‘डमी’वर शिक्का, ऐनवेळी विधानपरिषद उमेदवार बदलला, पंकजा मुंडेंच्या कट्टर समर्थकला उमेदवारी!

भाजपने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगून, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी दिली आहे. (Ramesh Karad)

भाजपचा 'डमी'वर शिक्का, ऐनवेळी विधानपरिषद उमेदवार बदलला, पंकजा मुंडेंच्या कट्टर समर्थकला उमेदवारी!
Follow us
| Updated on: May 12, 2020 | 3:56 PM

मुंबई : विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध जरी होणार (BJPs  Ramesh Karad to replace Ajit Gopchhade MLC polls) असली तरी त्यामध्ये रंगत येताना दिसत आहे. कारण भाजपने ऐनवेळी विधानपरिषदेचा उमेदवार बदलला आहे. भाजपने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगून, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी दिली आहे. गोपछडे यांनी 8 मे रोजी आपला अर्ज भरला होता, तर काल शेवटच्या दिवशी रमेश कराड यांनी आपली उमेदवारी दाखल केली. (BJPs  Ramesh Karad to replace Ajit Gopchhade MLC polls)

भाजपने 8 तारखेला अजित गोपछडे यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके यांचे उमेदवारी अर्ज भरले होते. त्याशिवाय डमी अर्ज म्हणून रमेश कराड आणि संदीप लेले यांना अर्ज भरण्यास सांगितले. पण आता डमी उमेदवार असलेले रमेश कराड हे मुख्य उमेदवार म्हणून भाजपने निवडले आहे.

रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळचे असल्याचं सांगण्यात येत आहे. कराड यांनी दोन वर्षापूर्वीही विधानपरिषद निवडणुकीत मोठी खेळी केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करुन विधानपरिषदेचं तिकीट मिळवलं होतं. मात्र अवघ्या पाच दिवसात त्यांनी माघार घेत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करुन, धनंजय मुंडे यांची मोठी अडचण केली होती. कारण त्यावेळी राष्ट्रवादीकडे उमेदवारच न उरल्याने, अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली होती.

त्यानंतर आताही ऐनवेळी भाजपने रमेश कराड यांना मैदानात उतरवलं आहे. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत. 2018 मध्ये बीड-उस्मानाबाद-लातूर या मतदारसंघातून निवडायच्या विधानपरिषद जागेसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला होता. मात्र ऐनवेळी माघार घेऊन त्यांनी भाजपच्या सुरेश धस यांना पाठिंबा दिला होता.

विधानसभा निवडणुकीला निराशा

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही रमेश कराड यांची निराशा झाली होती. शिवसेना-भाजप युतीमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला सुटला होता. त्यामुळे रमेश आप्पा कराड (Ramesh Karad latur rural) यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होती. कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा सूर आवळल्यानंतर अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचं रमेश कराड यांनी जाहीर केलं होतं.

कोण आहेत रमेश कराड?

  • रमेश कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते.
  • सध्या ते पंकजा मुंडेंचे समर्थक म्हणून ओळखले जातात
  • 2018 मध्ये त्यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेचं तिकीट दिलं होतं
  • मात्र अवघ्या पाच दिवसात त्यांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता

(BJPs  Ramesh Karad to replace Ajit Gopchhade MLC polls)

संबंधित बातम्या 

मतदारसंघ शिवसेनेला सुटला, रमेश कराड यांची पुन्हा निराशा

रमेश कराड यांच्यावर अखेर बंडखोरीची वेळ, अपक्ष अर्ज भरणार

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.