गणेश सोनोने, अकोलाः शेतकरी जागर मंचच्या वतीनं अकोल्यात रक्त यज्ञ आंदोलन करण्यात आलं. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात(Farmer agitation) मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना या यज्ञाद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. केंद्र सरकारनं केलेले कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचं जे आंदोलन मागील वर्षापासून सुरु आहे. त्यात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना या यज्ञाद्वारे आदरांजली वाहण्यात आली. या यज्ञात शेकडो शेतकरी पुत्रांनी सहभाग नोंदवला.
अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदर रक्तयज्ञाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांचे हक्क अबाधित राहण्यासाठी ज्या बांधवांनी बलीदान दिले, त्यांचे या कार्यक्रमात स्मरण करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात किन्नरांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
येत्या 26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान नरेंद्र मोदी सरकारने वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा कागदोपत्री होईपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असी भूमिका अनेक शेतकरी संघटनांनी घेतली आहे. वर्षभर सुरु असलेल्या या आंदोलनात 759 शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. त्या माय-बाप शेतकऱ्याला श्रद्धांजली म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जागर मंचतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
इतर बातम्या-