दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत संपली, BMC कडून आता कारवाईचा बडगा

ज्या दुकानांवर मराठीत पाटी नसेल त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर उद्यापासून (28 नोव्हेंबर) मुंबई महापालिकेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे.

दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत संपली, BMC कडून आता कारवाईचा बडगा
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 9:57 AM

मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : राज्यातील आस्थापने आणि दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत आता संपली आहे. राज्यातील सर्व दुकानांवर मराठीत पाट्या लावण्यासाठी न्यायालयाने 26 नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिली होती. ती काल संपली असून आता ज्या दुकानांवर मराठीत पाटी नसेल त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर उद्यापासून (28 नोव्हेंबर) मुंबई महापालिकेतर्फे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेही इशारा देण्यात आला होता. दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने 25 नोव्हेंबरची डेडलाईन दिली होती. ही डेडलाईन शनिवारी संपली. त्यामुळे मनसे कार्यकर्ते काल आक्रमक झाले होते. ज्या दुकानांवर मराठी पाट्या नाहीत त्या दुकानांच्या पाट्यांना मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासत आंदोलन केलं.

बीएमसी अधिकारी करणार कारवाई

पुढच्या दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. दिवाळी आणि दसऱ्याआधी मराठी पाट्या लावून आर्थिक उलाढाली वाढवण्याचा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिला होता. अखेर 26 नोव्हेंबर रोजी ही मुदत संपली. मात्र अजूनही राज्यात सर्वत्र मराठीत पाट्या दिसत नाही. काहीजणांनी नियम डावलल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आता मुंबई महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे.

त्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने संपूर्ण 24 वॉर्डमध्ये 75 अधिकारी नेमण्यात आले आहेत. हे अधिकारी 24 वॉर्डमध्ये दुकानांची पाहणी करतील. ज्या दुकानांवर मराठीत पाट्या नसतील, ज्यांनी नियमांचे पालन केले नसेल त्यांना दंड ठोठावण्यात येईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र या सर्वांवर व्यापाऱ्यांची काय भूमिका असेल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेचं खळ्ळखट्ट्याक सुरू

दरम्यान मनसेने पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दा हाती घेतला. दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने 25 नोव्हेंबरची डेडलाईन दिली होती. ही डेडलाईन संपल्यामुळे मनसे आक्रमक झालेली दिसली. ज्या दुकानांवर मराठी पाट्या नाहीत त्या दुकानांच्या पाट्यांना मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासत आंदोलन केलं

मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळीच दहिसर आणि ठाण्यात खळ्ळखट्ट्याक आंदोलन केलं. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना मनसे कार्यकर्त्यांनी टार्गेट केलं. या कार्यकर्त्यांनी दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळं फासत निषेध नोंदवला. दुकाने आणि शोरुमलाही मनसे कार्यकर्त्यांनी लक्ष्य करत जोरदार घोषणाबाजीही दिली. दहिसरमध्ये तर दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे या परिसरातील वातावरण चांगलंच तापलं होतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.