‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी बॉलिवूड गाण्याचे मॅशअॅप, रोहित पवारांकडून व्हिडीओ शेअर
खासदार अमोल कोल्हेंनंतर आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या जनजागृतीसाठी एक व्हिडीओ ट्विट केला (Rohit Pawar Corona Virus Video) आहे.
मुंबई : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Rohit Pawar Corona Virus Video) आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 177 झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 49 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. खासदार अमोल कोल्हेंनंतर आता राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या जनजागृतीसाठी एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
यात रोहित पवार यांनी कोरोनापासून बचावासाठी (Rohit Pawar Corona Virus Video) एक मजेशीर व्हिडीओ केला आहे. यात त्यांनी कोरोनापासून वाचण्याचे 10 उपाय सुचवले आहेत. हे उपाय सांगताना त्यांनी प्रत्येक उपायानंतर त्या संबंधित एखादी जाहिरात किंवा चित्रपटांमधील गाणी वापरली आहेत.
- जागरुक राहा
- हात स्वच्छ धुवा
- गर्दी टाळा
- हाताने तोंडाला आणि इतरत्र स्पर्श करु नका
- सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असणाऱ्यांनी रुमाल किंवा मास्कचा नियमित वापर करा
- घर, परिसर स्वच्छ ठेवा
- एकटे राहणे सर्वोत्तम
- सर्दी, ताप, खोकला, उलटी होत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या.
- अफवा पसरवू नका
- सुरक्षित राहा
कोरोनाविरोधात लढताना प्रत्यक्षात एकत्र न येता सोशल मीडियातून एकत्र येऊ. लोकांमधील भीती दूर करुन जागृती करण्यासाठी रोज सकाळी 9 वा. कोरोनाबाबत जनजागृती करणारी बातमी/माहिती (Rohit Pawar Corona Virus Video) मी सोशल मीडियातून शेअर करणार तुम्हीही शेअर करा. मित्राने बनवलेला असाच एक व्हिडिओ मी शेअर करतोय, असे रोहित पवार हा व्हिडीओ शेअर करताना म्हणाले.
कोरोनाविरोधात लढताना प्रत्यक्षात एकत्र न येता सोशल मीडियातून एकत्र येऊ. लोकांमधील भीती दूर करुन जागृती करण्यासाठी रोज सकाळी 9 वा. कोरोनाबाबत जनजागृती करणारी बातमी/माहिती मी सोशल मीडियातून शेअर करणार तुम्हीही शेअर करा. मित्राने बनवलेला असाच एक व्हिडिओ मी शेअर करतोय.#कोरोनाशी_लढूना pic.twitter.com/G1TYJprKlx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 19, 2020
दरम्यान, काल (18 मार्च) अशाचप्रकारे खासदार अमोल कोल्हे ‘कोरोना’पासून बचावासाठी एक भन्नाट आयडिया सुचवली होती.
“हात धुवा, हात धुवा, हात धुवा, असे धुवा, तसे धुवा, ऐकून ऐकून कंटाळा आला असेल ना? ऐकण्याचा कंटाळा (Amol kolhe SUMAN M Idea) येऊ द्या, हात धुण्याचा मात्र कंटाळा करु नका, असे अमोल कोल्हेंनी या व्हिडीओत म्हटलं आहे.
“अत्यंत सोपी आणि साधी हात धुण्याची पद्धत आहे. त्यासाठी SUMAN M’ हे नाव लक्षात ठेवा. साबण लावून कमीत कमी 20 सेकंद हे चाललं पाहिजे. S – सरळ, U- उलट, M – मूठ, A- अंगठा, N – नखं आणि M म्हणजे मनगट,” असे अमोल कोल्हेंनी या व्हिडीओत (Rohit Pawar Corona Virus Video) म्हटलं आहे.