बूस्टर डोसची तयारी पूर्ण, दहा जानेवारीपासून ज्येष्ठांना तिसरा डोस – राजेश टोपे

राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. कोरोनाच्या बूस्टर डोसची तयारी अंतिम टप्प्यात असून, येत्या दहा जानेवारीपासून बूस्टर डोसला सुरुवात होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

बूस्टर डोसची तयारी पूर्ण, दहा जानेवारीपासून ज्येष्ठांना तिसरा डोस - राजेश टोपे
राजेश टोपे
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 6:00 PM

जालना: राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. कोरोनाच्या बूस्टर डोसची तयारी अंतिम टप्प्यात असून, येत्या दहा जानेवारीपासून बूस्टर डोसला सुरुवात होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ज्यांनी पूर्वी दोनही डोस हे कोविशिल्डचे घेतले आहेत, त्यांना कोविशिल्डचा तर ज्यांनी कोवॅक्सिनचे घेतले आहेत त्यांना कोवॅक्सिनचा डोस देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात लसीचा तुटवडा

पुढे बोलताना टोपे म्हणाले की, कोरोनाला आळा घालायचा असेल तर लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, सोबतच राज्यात सध्या 15 ते 18 वयोगटातील मुलांचे देखील लसीकरण सुरू आहे. मोठ्याप्रमाणात लसीकरण सुरू असल्याने सध्या राज्यात लसीचा तुटवडा जाणवत आहे. कोविशिल्डच्या साठ लाख तर कोव्हॅक्सिनच्या 40 लाख लसी कमी पडत आहेत. राज्याला अतिरिक्त लसींचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आम्ही केंद्राकडे केल्याची माहिती देखील यावेळी टोपे यांनी दिली.

निर्बंधांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार

दरम्यान गर्दीमुळे कोरोना वाढत असल्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन देखील यावेळी टोपे यांनी केले आहे.  कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास निर्बंध आणखी वाढू शकता. निर्बंध वाढवायचे की नाही? यावर मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सक्तीने क्वॉरटांईन करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी टोपे यांनी म्हलटे आहे.

संबंधित बातम्या

मराठा आरक्षण पुन्हा सुप्रीम कोर्टात, विनोद पाटलांच्या पुनर्विचार याचिकेवर होणार सुनावणी

शिवसेनाचा साधा सरपंचही नाही गोव्यात, या प्रमोद सावंतांच्या वक्तव्याला राऊतांचं प्रत्युत्तर!

खुलताबाद पंचायत समितीच्या उभसभापतीपदी प्रभाकर शिंदेंची निवड, भाजप कार्यकर्त्यांचा आनंदात जल्लोष

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.