भाजप आमदार संजय उपाध्याय यांचा बांगलादेशी मजुरांबाबत मोठा आरोप
बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी बांगलादेशींविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. त्यांनी बीएमसीत बोगस कागदपत्रे वापरून बांगलादेशी मजूर काम करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणतात की, "ते बोरिवलीला बांगलादेश बनू देणार नाही."
विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी बांगलादेशींविरोधात आपली मोहीम सुरु केली आहे. बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी बांगलादेशींविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी बीएमसीमध्ये मजूर म्हणून काम करणारे बांगलादेशी मजूर असल्याचा आरोप केला आहे. “निवडणुकीच्या प्रचारावेली आम्ही बोरिवलीच्या बांगलादेश होऊ देणार नाही हे सांगितलं होतं. तेव्हा लोकांनी प्रश्न विचारला बोरिवलीत बंगलादेशी कुठे आहेत? लोकांनी मला मतदान केलं मोठे लीड दिलं. बीएमसी, पोलीस अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला बोलून मी सांगितलं की, तुमच्याकडे काम करणारे लेबरची यादी द्या. आता दहा दिवस झाले त्यांनी आधी देता आले नाही. त्यानंतर बिल्डर असोसिएशनचे काही लोक मला भेटले. त्यांना पण मी लेबरचं काम करणारे लोकांची यादी मागितली”, असं संजय उपाध्याय म्हणाले.
“माझा स्पष्ट आरोप आहे की, हे लोक बंगलादेशी आहेत. बोगस डॉक्युमेंट तयार करून आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवले आहेत. हे लोक गव्हरमेंटच्या किंवा प्रायव्हेट साईटवर काम करतात. बोरिवली आध्यात्मिक सांस्कृतिक हिंदू बहुल नागरी आहे आणि मी आज पण स्पष्ट सांगतो की बोरिवलीच्या बंगलादेश होऊन देणार नाही”, असा आरोप संजय उपाध्याय यांनी केला.
संजय उपाध्याय मंत्रिमंडळ विस्तारावर काय म्हणाले?
यावेळी संजय उपाध्याय यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरही प्रतिक्रिया दिली. “मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा आहे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष अधिकार आहे. त्यांना ज्यावेळी योग्य वाटेल ते निर्णय घेतील आणि विस्तार होईल. पक्षांनी सध्या मला दिल्ली निवडणुकीसाठी जबाबदारी दिली आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी चांगले रितीने पूर्ण करेन. प्रत्येक कामाची माझी तयारी आहे”, असं संजय उपाध्याय म्हणाले.