Mask Compulsory : राज्यात पुन्हा मास्क सक्ती! कोरोना रुग्ण वाढत असल्याने सरकारचा मोठा निर्णय
मागच्या काही दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक असेल. वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. रुग्णालये, कॉलेज, शाळा या ठिकाणीही मास्क सक्ती असेल.
मास्क सक्ती
राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक असेल. वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. आरोग्य सचिवांलयाकडून प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.
कुठे-कुठे मास्क बंधनकारक?
1 सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणं
2 शाळा
3. कॉलेज
4. बंदीस्त सभागृह
5. गर्दीची ठिकाणं
6.रेल्वे
7. बस
8. सिनेमागृहे
9. रुग्णालये
10. हॉटेल
पुन्हा मास्क सक्ती का?
मागच्या काही दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. कोरोना रुग्णांची संख्या जास्त वाढू नये, म्हणून सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी या नियमांचं पालन करत सहकार्य करण्याचं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे. काही दिवसांआधी मास्कमुक्तीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता कोरोना रूग्णांची सध्या वाढत असल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.