LIVE : आज राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर…
संजय राऊत यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट, कालिदास कला मंदिर येथील कार्यक्रमात दोघेही एकाच व्यासपीठावर येणार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या हस्ते आज जेजुरी गडावर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी शरद पवार म्हणाले की, अहिल्याबाई या महाराष्ट्राचं कुलदैवत… राज्याच्या कानाकोपऱ्यातले लोक श्रद्धेने येथे येतात.. या प्रांगणात येणाऱ्या प्रत्येकाला हा पुतळा प्रेरणा देईल..
पालघर : द ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बहुप्रतिक्षित निवडणूक अखेर जाहीर झाली आहे.
द ठाणे जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी 30 मार्च रोजी मतदान होणार असून 26 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.
दाखल झालेल्या अर्जांची छानणी 5 मार्चला होणार आहे.
8 ते 22 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
21 जागांसाठी 30 मार्चला मतदान होणार असून 31मार्च रोजी मतमोजणी होणार आहे
अकोला : अकोल्यात आज सकाळच्या अहवालात 105 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
ऐकूण कोरोना बाधितांचा आकडा 12,275 झाला आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत 342 जणांचा मृत्यू.
तर 11066 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
उपचार घेत असलेले रुग्ण 867 आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती.
पूजा चव्हाणची आत्महत्या प्रकरणात उद्धव ठाकरे न्याय देणार का असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
अशा प्रश्नावर नेहमीच न्याय भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तसेच महिलांचा सन्मान करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या वाटेवर आपण चालतो असे सांगणारे उद्धव ठाकरे ते पूजा चव्हाण ला न्याय देणार का – चंद्रकांत पाटील
या प्रकरणात एक मंत्री गुंतले आहेत हे स्पष्ट झाले आहे. मात्र पोलूस चौकशी का करत नाही. मुलीचे आई-वडील तक्रार देत नसतील तर सुमोटो केस दाखल केली पाहिजे.
या सरकारची प्रतिमा डागळत चालली आहे. काही करा काही होत नाही असे या सरकारच्या काळात झाले आहे.
एक मंत्री 15 वर्ष एक महिले सोबत राहतो. महिलेची तक्रार असून ही कारवाई होत नाही. एक मंत्री कार्यालयात बोलवून मारहाण करतो. या सरकारमध्ये चाललय काय?
पूजा चव्हाणच्या निमित्ताने हे सर्व प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
पूर्ण महाराष्ट असुरक्षित झाला आहे. सत्तेसाठी काहीही करणार असे झाले आहे. ज्यांच्या इशाऱ्यावर हे सरकार चालते त्या पवारांनी यात लक्ष घालावे.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पॉवरचा उपयोग करून चौकशी केली पाहिजे. त्यात मंत्री गुंतल्याचे बोलले जाते त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
त्या मुलीच्या पाळतीवर ठेवलेल्या 2 जणांना अटक का झाली नाही? त्यांना का सोडून दिले?
मुलीचा लॅपटॉप जप्त केला पाहिजे.
त्याची तपासणी केली पाहिजे.
पोलिस गेल्या काही महिन्यात दबावा खाली असल्याचे दिसून येतंय.
खडसे यांच्या सीडी काढतो वक्तव्यावर.
गेल्या 14 पंधरा महिन्यात अनेकांनी धमक्या दिल्या आम्ही म्हणतो काढा सिड्या कोण आहे दोषी ते कळू द्या आम्ही घाबरत नाही.
सांगली : वाळवा येथे हवेत गोळीबार
जीवे मारण्याच्या उद्देशाने डोळ्यात चटणी टाकून केला हल्ला
तलवार, कोयत्याने वार करत हवेतही केला गोळीबार
अतुल अहिर, अंकुश अहिर, रोहन अहिर, प्रशांत अहिर जखमी
घटना घडताच पोलीस घटनास्थळी जखमी.
जखमींवर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार
ठाकरे सरकार मध्ये महिलांवर अत्याचार करणारे मंत्री तर आहेतच पण आता विजय वडेट्टीवार सारखे मनोरुग्ण मंत्री सुद्धा आहेत. विजय वडेट्टीवार यांनी साधूंच्या परंपरेवर टीका केली आहे. साधूंना नालायक म्हणतात असं म्हणताना विजय वडेट्टीवार यांना लाज वाटली पाहिजे. आपण मंत्री झालात म्हणून आपल्याला साधूंना शिव्या घालण्याचा परवाना मिळालेला नाही. विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ साधूंची माफी मागावी नाही तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
कोरोना आढावा बैठक संपन्न झाली, थोडी चिंता निश्चितने वाढते आहे, 12 फेब्रुवारी ला 296 रुग्ण आढळले आहेत, दिवसाला 300 रुग्ण आढळून येत आहेत, मागच्या 8-10 दिवसातला ट्रेंड विचार करायला लावणारा, नागपूर , मुंबईत देखिल कोरोना वाढतोय, लॉकडाऊन उठवल्या नंतर कोरोना वाढतोय, मास्क वापरण्याच्या संदर्भात लोकांमध्ये महत्व कमी झाल्याचं दिसतंय, लोक मास्क वापरत नाहीत
लालकिल्ल्यावरील धुडगूसीबाबत शरद पवारांचा सत्ताधारी मोदी सरकारव आरोप
– लालकिल्ल्यावर गडबड करणारे आंदोलक शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते अशी माहिती आम्हाला मिळाली
– पंजाब, युपी, बिहार आदी राज्यातील शेतकरी टप्प्याटप्प्याने तेथे उपोषणाला बसले आहेत
– खरेदीची आणि मालाची योग्य किंमत द्यावी एकढीच मागणी आहे
– केंद्र सरकार केवळ आश्वासन देतोय मात्र प्रत्यक्ष करत नाही
पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी विरोधकांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर ठपका ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली असताना संजय राठोड हे गेले दोन दिवस त्यांची गाडी (MH 01DP 7585) मंत्रालयाच्या प्रांगणात ठेऊन अज्ञातवासात गेले आहेत.
विरोधाला विरोध म्हणून काही लोक दिल्लीत बसलेत
यांना कृषी कायदा नको आहे
या सगळ्या संधीसाधू लोकांना देवाने चांगली बुद्धी द्यावी म्हणून प्रदक्षिणा घालतो
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा पोलिसांनी ताबडतोब छडा लावावा
जो कोणी मंत्री असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे भाजपाला ईडी लावून राजकारण करण्याची गरज नाही
विज कनेक्शन तोडाल तर जशाच तसे उत्तर दिले जाईल. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत
पुणे : मराठा आरक्षणाला आरपीआयचा संपूर्ण पाठिंबा मात्र त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. ओबीसीमध्ये टाकून वाद निमार्ण करू नये- रामदास आठवले.
2021ची जनगणना जातीच्या आधारावर करावी ही पंतप्रधानकडे मागणी. त्यामुळे जाती निहाय आकडेवारी कळायला मदत होईल.
दिल्लीतील आंदोलन मागे घेतले जावे, मात्र आंदोलन रेटले जात आहे. त्यांच्या सरकारच्या टिकेला अर्थ नाही.ते भडकवत आहेत- रामदास आठवले
राहुल गांधी यांनी आता लग्न करावे आणि त्यांनी हम दो हमारे दो करावे, त्यांच्या सरकारच्या टिकेला अर्थ नाही. ते भडकवत आहेत- रामदास आठवले
सोलापूर : काँग्रेस कार्याध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यमंत्री प्रणिती शिंदे प्रथमच सोलापुरात
सोलापुरात शिंदे यांचे क्रेनद्वारे हार घालून स्वागत
शिंदे यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत
काँग्रेस भवनातसुद्धा ढोल ताशांच्या गजरात स्वागत
कणकवलीत दंगल काबू पथके तैनात, खासदार विनायक राऊत आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत दंगल काबू पथके तैनात, गेले काही दिवस आजी आणि माजी खासदारांमधला वाद विकोपाला, शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते ही या वादात ओढले गेले, हा वाद विकोपाला जाऊन अघटीत कृत्य घडू नये यासाठी दक्षता म्हणून संवेदनशील असलेल्या कणकवलीत दोन पथके तैनात
जळगाव – पिता-पुत्राच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली जळगावात
बापाने आपल्या पोटच्या मुलाचाच खून केल्याने प्रचंड खळबळ
सौरभ सुभाष वर्मा वय 26 होते दारूचे व्यसन
पोटात सुरा खुपसून केला बापाने खून
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चंद्रपूर शहरातील शाखेत मोठा आर्थिक घोटाळा, घोटाळ्याचा आकडा दीड कोटींवर असल्याची प्राथमिक माहिती, रोखपाल पदावर असलेल्या व्यक्तीने केली ग्राहकांची फसवणूक, ग्राहकांनी दिलेले पैसे अकाउंटला न टाकता स्वतः खिशात टाकले, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता प्रकार, एका सहकारी सोसायटीने भरायला दिलेली मोठी रक्कम खात्यात जमा न झाल्याने फुटले बिंग, बँकेने सुरू केली अंतर्गत चौकशी- पोलिसात तक्रार देण्याची तयारी सुरू, किती ग्राहकांना फसवले, याचा तपशील चौकशीत येणार समोर
सोलापुर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सभासळी दाखल
दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या द्राक्षवाणाचे हस्ते होणार आहे लोकार्पण
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
अहमदनगरमध्ये वीजबिल वसुली विरोधात रस्ता रोको, श्रीगोंदा तालुक्यात नगर दौंड महामार्गावर रस्ता रोको, रयत क्रांती शेतकरी संघटने कडून शासनाच्या सक्तीच्या वीजबिल वसुली धोरणाविरोधात आंदोलन, दीड तास रस्ता रोको करून सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी आणि वीज कनेक्शन तोडू नये यासाठी केलं आंदोलन,
सोलापुर — राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार थोड्याच वेळात नान्नज येथे दाखल होणार
दत्तात्रय काळे या शेतकऱ्याने विकसित केलेल्या किंगबेरी द्राक्षवाणाचे पवारांच्या हस्ते लोकार्पण
,
पालकमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार
यवतमाळ : बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण हिचा पुण्यामध्ये उच्चभ्रू वसाहतीत संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. तिला न्याय मिळवून देण्यासाठी बंजारा समाजाने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन शेतकरी नेते तथा विमुक्त घुमंतू जनजाति महासभा प्रदेश अध्यक्ष मनीष जाधव यांनी बंजारा समाजाला केले आहे.
गेल्या 24 तासात 296 नव्या कोरोना रूग्णांची नोंद तर 180 रुग्णांना देण्यात आले डिस्चार्ज
शहरात 214,ग्रामीण 64 तर मालेगाव मध्ये 9 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद
दोन ते तीन दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत असल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण
नाशिक – गंगापूर रोड परिसरात गोळ्या झाडलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला
मृतदेहा शेजारीच पिस्तूल आढळल्याने हत्या की आत्महत्या गुढ कायम
अवघ्या चार दिवसात नाशिक शहरातील तिसरी घटना
मयत झालेल्या युवकाच नाव रोहित राजेंद्र नागरे
पत्ता कोबी आणि फ्लॉवरच्या दरात मोठी घसरण
– उत्पादनखर्च तर दूर काढणी आणि वाहतूक खर्चही निघणे मुश्कील
– हवालदील झालेल्या शेतकऱ्यांने उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्याना चरण्यासाठी सोडून दिल्या
– येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील घटना
जळगाव – राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा आज मेळावा
लोक प्रतिनिधी व सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहाणार
गेल्या तीन दिवसांपासून जयंत पाटील जिल्हा दौऱ्यावर
आज संवाद यात्रेचा समारोप, शेवटच्या दिवशी जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी बैठकीत चर्चा
सिरमच्या आगीत होरपळून मृत्यू झालेल्या प्रतीक पाष्टेंच्या कुटुंबाला अजूनही मदत नाहीच,
– सिरमच्या कोणीच अधिकाऱ्यांनी संपर्क साधला नसल्याची कुटुंबाची माहिती,
– सिरमच्या आगीतील मृत्युमुखी पडलेल्यांना मदत कधी मिळणार ?
– सिरमने फक्त घोषणा केली प्रत्यक्षात मदत कधी ?
– 25 लाखांची मदत प्रतिक पाष्टेंच्या कुटुंबाला कधी मिळणार ?
– 1 महिना उलटूनही मदतीची कोणतीच हालचाल नाही
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा निवासाचा प्रश्न प्रलंबित,
– पुणे विद्यापीठाचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार आहेत,
– पण विद्यापीठात शिकणारे बहुतांश विद्यार्थी वसतिगृहात राहतात. त्यामुळे त्यांच्या निवासाची व्यवस्था कशी करणार, हा प्रश्न कायम आहे,
– यावर आज बैठक घेऊन नियमावली तयार करू असे विद्यापीठाकडून स्पष्ट,
– राज्य सरकारने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
– पुणे विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना सुमारे ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत,
– यातील 50 टक्के विद्यार्थी हे वसतिगृहात राहातात.
महापालिका शाळेतील शिक्षकाला कोरोनाची लागण,
– शाळा सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश,
– कोंढव्यातील महापालिकेच्या एका संत गाडगे महाराज शाळेतील शिक्षकाला कोरोनाची लागण,
– शिक्षकाच्या संपर्कातील अन्य शिक्षक-कर्मचाऱ्यांची तपासणी होणार आहे
– त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत शाळा बंद राहणार आहे.
– शाळेतील वर्गखोल्यांसह इमारत आणि मैदानाचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे,
– गरजेनुसार शिक्षण आणि विद्यार्थ्यांची तपासणी करणार,
– महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांची माहिती
वाळूज एमआयडीसी परिसरात टोळक्याची तरुणाला बेदम मारहाण
निवडणुकीच्या कारणावरून केली बेदम मारहाण
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत उभं राहू नये यासाठी केली मारहाण
मारहाणीत अक्षय काळे झाला गंभीर जखमी
मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
मारहाण प्रकरणी 5 जनावर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री अमित शहांच्या दौऱ्यानंतर शिवसेनेच्या बड्या नेत्याचा पहिला दौरा
गुहागर तालुक्यातील रामपूर इथं रोजगार मेळाव्याला हजेरी
कोकणातल्या सेना भाजपच्या राजकीय शिमग्यानंतर आदित्य काय बोलणार याची उत्सुकता
सकाळी ११ वाजता होणार चिपळूणात दाखल
चाकणमध्ये किराणा मालाच्या दुकानातून दीड लाखाचा गुटखा जप्त
-विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेला गुटखा सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून पकडला. चाकण येथे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये एक लाख 55 हजारांचा गुटखा जप्त
-दिनेश अंबादास सोळंके याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला केली अटक
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची अखेर राज्य सरकारने पुणे येथील नोंदणी महानिरीक्षकपदी बदली
-त्यांच्याजागी ओडिसा केडरचे राजेश पाटील यांची पिंपरी महापालिका आयुक्तपदी वर्णी
-श्रावण हर्डीकर यांचा महापालिकेतील पावणे चार वर्षाचा कार्यकाळ हा संमिश्र राहिला
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर
औरंगाबाद महापालिकेला सकाळी 11 वाजता देणार भेट
औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट महत्वाची
शहरातील विविध विकास कामांचे करणार उदघाटन
तर जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आढावा बैठक
एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी
शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपचा राडा
सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात भाजपचा राडा
अब्दुल सत्तार यांच्या ताब्यातील नागरपरिषदेत भ्रष्टाचार होत असल्याचा भाजपचा आरोप
सिल्लोड शहरातील अडीचशे बांधकामे थांबवल्याच्या आरोपावरून जोरदार राडा
भाजप कार्यकर्ते आणि पोलिसात मोठी झटपट
आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
नागपूर शहरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट
– पाच दिवसांत १७१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
– मनपा मुख्यालयातंच कोरोनाच्या नियामांचं पालन नाही
– मनपा मुख्यालयातंच कर्मचारी
विनामास्क वावरतात
– आयुक्तांच्या कॅबीनबाहेर निवामास्क कर्मचारी
– शहरात विनामास्कची कारवाई करणाऱ्या मनपाच्या दिव्याखाली अंधार
– मनपाचे विधी सभापती धर्मपाल मेश्राम यांची कारवाईची मागणी
शारजावरुन येणारे विमानप्रवासी होणार सात दिवस क्वारंटाईन
– संस्थात्मक विलीगीकरणाचे आदेश नागपूर मनपाकडून जारी
– १४, २१ आणि २८ तारखेला येणार शारजावरुन विमान
– कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर मनपाचे आदेश जारी
– विमानतळावरुन प्रवशांना हॅाटेलमध्ये पाठवणार
नागपूरात 3000 थकबाकीदारांना महावितरणचा शॅाक
– 3000 थकबाकीदारांचे वीज कनेक्शन महावितरणने कापले
– जिल्ह्यात 1 लाख 38 हजार ग्राहकांनी एप्रिलपासून वीज बिल भरलंच नाही
– जिल्ह्यात 220 कोटींची थकबाकी
– थकबाकीदार ग्राहकांना शॅाक देण्याची मोहिम सुरु
परभणी शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका लॉजमधून 22 किलो 700 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये काही व्यक्तींनी अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी आणला असल्याची माहिती विशेष पथकास मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास लॉज परिसरात छापा टाकला. त्यावेळी तिथे दोन व्यक्ती आढळून आल्या. त्यांची चौकशी करत त्यांच्याजवळील साहित्याची तपासणी केली असता तीन वेगवेगळ्या पिशव्यांत गांजा आढळून आला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून एकूण नऊ आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज 13 फेब्रुवारी रोजी सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान इथं आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांची सभा आहे. ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी हे दोन आमदार कवठेपिरान या ठिकाणी येत आहेत. याच ठिकाणी त्यांची प्रेस सुद्धा होणार आहे.