Breaking : मुंबईत एमएमआर रिजनमध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ, 3 रुपयांनी प्रवास महागणार
पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढत आहेत. त्यामुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. मात्र, भाडेवाढीचा निर्णय होत असल्यानं आता त्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई : एमएमआर रिजनमध्ये ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये करण्याचा निर्णय झाला आहे. परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढत आहेत. त्यामुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. मात्र, भाडेवाढीचा निर्णय होत असल्यानं आता त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, इंधन दरवाढीचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे.(Rickshaw and taxi fares increase by Rs 3 in Mumbai MMR region)
रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ठाकरे सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाडेवाढीची घोषणा केली आहे. वाढलेल्या भाड्यानुसार आता ऑटो रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये होणार आहे. परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. पेट्रोलने तर शंभरी गाठली आहे. अशावेळी रिक्षा आणि टॅक्सी संघटना भाडेवाढीची मागणी करत होते. त्यासाठी या संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या. भाडेवाढीच्या निर्णयामुळे या संघटनांना दिलासा मिळाला आहे. पण, आधीच पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर आणि त्यात रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर
नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.58 रुपये प्रति लिटर
मुंबई (Mumbai Petrol Price Today): 97.00 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 91.78 रुपये प्रति लिटर
चेन्नई (Chennai Petrol Price Today): 92.59 रुपये प्रति लिटर
नोएडा (Noida Petrol Price Today): 88.92 रुपये प्रति लिटर
प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव
नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.97 रुपये प्रति लिटर
मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.06 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.56 रुपये प्रति लिटर
चेन्नई (Chennai Diesel Price Today): 85.98 रुपये प्रति लिटर
नोएडा (Noida Diesel Price Today): 81.41 रुपये प्रति लिटर
VIDEO | बाईकच्या धडकेनंतर आग, पुण्यात सीएनजी बस जळून खाक https://t.co/5VsZ05lLHR #Pune | #CNGBus | #BusFire | #PuneFire
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2021
संबंधित बातम्या :
Petrol Diesel Price Today : सलग दुसऱ्या दिवशी दिलासा, वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीला 12 दिवसांनंतर ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Rickshaw and taxi fares increase by Rs 3 in Mumbai MMR region