घरात एकटी असताना विजेचा धक्का, बुलडाण्यात 20 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू
बुलडाणा तालुक्यातील टाकळी वाघजाळ या ठिकाणी विजेचा धक्का लागून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. यावेळी शुभांगीच्या घराचे शेतात गेले होते.
बुलडाणा : विजेचा धक्का लागून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. बुलडाण्यातील मोताळा तालुक्यात ही घटना घडली. काल संध्याकाळी ही घटना समोर आली आहे. शुभांगी महादेव आढाव असे या तरुणीचे नाव आहे. (Buldhana 20-year-old girl died due to Electric shock in the house)
विजेचा धक्का लागून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू
बुलडाणा तालुक्यातील टाकळी वाघजाळ या ठिकाणी विजेचा धक्का लागून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. यावेळी शुभांगीच्या घराचे शेतात गेले होते. त्यामुळे ती त्यावेळी घरात एकटीच होती. याच दरम्यान तिला विजेचा धक्का लागल्याचे सांगण्यात येत आहे.
आकस्मिक मृत्यूची नोंद
संध्याकाळी शेतातील काम झाल्यानंतर तिची आई घरी परतली असताना ती बेशुद्धावस्थेत पडली होती. त्यावेळी तिच्या नातेवाईंकांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिला बुलडाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
नवेगांव-नागझिरा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी; पाच दिवसांत 75500 रुपयांचा महसूल https://t.co/tRXCRjQsQl #Toursit #Navgaon #Sanctury #Rain
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 21, 2021
(Buldhana 20-year-old girl died due to Electric shock in the house)
संबंधित बातम्या :
शेततळ्यात पोहण्याचा नाद जिवावर बेतला, गाळात फसल्याने दोन शाळकरी मुलांचा अंत