AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhendwal Prediction | भेंडवळच्या भविष्यवाणीला लॉकडाऊनचा फटका, 300 वर्षांची परंपरा खंडित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे यंदाची घटमांडणीही स्थगित करण्यात आली आहे.

Bhendwal Prediction | भेंडवळच्या भविष्यवाणीला लॉकडाऊनचा फटका, 300 वर्षांची परंपरा खंडित
Follow us
| Updated on: Apr 25, 2020 | 6:10 PM

बुलडाणा : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी (Buldhana Bhendwal Bhavishyavani) भेंडवळची भविष्यवाणी यावर्षी स्थगित करण्यात आली आहे. पाऊस-पाण्याचा अंदाज वर्तवणाऱ्या बुलडाण्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीला 300 वर्षांची परंपरा आहे. घटमांडणी करुन पीक-पाण्याचा अंदाज या भेंडवळच्या भविष्यवाणीतून केला जातो. राज्यभरातील शेतकऱ्यांचं या अंदाजाकडे लक्ष असतं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे यंदाची घटमांडणीही (Buldhana Bhendwal Bhavishyavani) स्थगित करण्यात आली आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी भेंडवळ येथे घटमांडणी करण्यात येते. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे ही घटमांडणी पुढे ढकलून लॉकडाऊन संपल्यावर म्हणजेच 3 मेनंतर वैशाख महिन्यातील कुठल्याही शुभ तिथीला घटमांडणी साकारण्याचे संकेत वाघ महाराजांनी दिले आहेत. त्यामुळे घटमांडणी रद्द नव्हे तर स्थगित झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावात गेल्या 300 वर्षांपासून घटमांडणीची परंपरा आहे. येथील वाघ घराण्यात ही परंपरा असून, गेल्या 300 वर्षांपूर्वी निलावती विद्येचे ज्ञान असलेले चंद्रभान महाराज वाघ यांनी ती सुरु केली होती. आजही त्याच परिवारात ही परंपरा सुरु आहे (Buldhana Bhendwal Bhavishyavani). जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यातील शेतकर्‍यांचा या मांडणीच्या भाकितावर प्रचंड विश्वास आहे. शेतकरी या मांडणीवर दरवर्षी पीक-पाण्याचे नियोजन करतात.

भेंडवळची घटमांडणी कशी केली जाते?

अक्षयतृतीयेला सूर्यास्तापूर्वी गावाबाहेर शेतात वाघ घराण्याचे वंशज घटाची मांडणी करतात. घटामध्ये अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा गोलाकार मांडली जातात. घटाच्या मध्यभागी खोल खड्डा करुन त्यात पावसाळ्याच्या 4 महिन्यांचे प्रतिक असलेली 4 मातीची ढेकळे ठेवली जातात. त्यावर पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोळी, कुरडई, तर खाली विड्याच्या पानावर सुपारी ठेऊन प्रतिकात्मक मांडणी केली जाते.

दुसर्‍या दिवशी सूर्योदयापूर्वी या घटात झालेल्या बदलावरुन भविष्य वर्तवण्यात येते. पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं. आतापर्यंत हे भाकित वयोवृध्द रामदास वाघ हे कथन करायचे. मात्र, त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर वाघ हे भविष्य कथन करतात.

या घटमांडणीला जवळपास 4 ते 5 हजार लोक जमतात. त्यामुळे कोरोनाचा धोका ओळखून प्रशासनाला सहकार्य म्हणून अक्षयतृतीयेची घटमांडणी रद्द करीत असून वैशाख महिन्यातील कुठल्याही तिथीला, लॉकडाऊन संपल्यानंतर घटमांडणी करता येईल, असे सारंगधर महाराजांनी (Buldhana Bhendwal Bhavishyavani) सांगितलं.

संबंधित बातम्या :

Coronavirus Lockdown : दारुची दुकानं बंदच राहणार, केंद्राने नेमकं काय म्हटलंय?

Yavatmal Corona Update | यवतमाळला वाढता विळखा, कोरोनाबाधितांची संख्या 25 वर

कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि उपचार मोफत : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

औरंगाबादेत कोरोनाचा कहर, 24 तासात 7 नव्या रुग्णांची नोंद

पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.