Buldhana Accident : बसचे बुकींग नव्हते, ते दोघे रस्त्यात बसले, त्या दोन्ही प्रवाशांचे झाले तरी काय?

Buldhana Bus Accident : बुलढाणाजवळ शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे. तसेच दोन जण असेही आहेत ज्यांची बसमध्ये बुकींग नव्हते.

Buldhana Accident : बसचे बुकींग नव्हते, ते दोघे रस्त्यात बसले, त्या दोन्ही प्रवाशांचे झाले तरी काय?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 4:27 PM

विठ्ठल देशमुख, वाशिम : समृध्दी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात २६ प्रवाशांचा मृत्यू झाला. महामार्गावर या बसने पेट घेतल्यानंतर बसमध्ये असलेल्या २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या सर्वांची नावे अद्याप जाहीर स्पष्ट झाली नाही. परंतु या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये स्त्रियांची संख्याही अधिक आहे. दरम्यान या अपघातग्रस्त बसमध्ये बुकींग केलेल्या प्रवाशांशिवाय इतर काही जण बसले होते. या बसमध्ये बुकींग केलेले एकूण ३३ प्रवासी होते.

त्या ठिकाणावरुन दोघे चढले

अपघातग्रस्त बस ही नागपूरवरून पुण्यासाठी निघाली होती. अपघाताच्या काही तास अगोदर म्हणजेच शुक्रवारी रात्री 10 वाजता वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील एका हॉटेलवर बस थांबली. कारंजा येथील न्यू राधाकृष्ण हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी चालकाने बस थांबली होती. बसचालक अन् इतर काही प्रवाशांनी जेवण केले. त्यानंतर बस पुण्याकडे निघाली. कारंजा येथून दोन प्रवाशी विना बुकींग या बसमध्ये बसले. सीसीटीव्ही फुटेजमधून ही माहिती समोर आली आहे. कारंजा तालुक्यातील शिवनगर येथील मनीषा विजय बहाले आणि संजय गोविंदराव बहाळे असे प्रवाशांचे नावे आहेत. हे दोन्ही जण ट्रॅव्हल्समध्ये बसल्यानंतर बस पुढे निघाली.

अन् पुढे अपघात झाला

खासगी ट्रॅव्हलच्या या बसने रात्री ११ वाजता कारंजा टोलनाका सोडला. त्यानंतर दोन ते अडीच तासांनी बस सिंदखेडराजा येथे पोहचली. त्या ठिकाणी याबसचा अपघात झाला. एका खांबाला धडक दिल्यानंतर बस दुभाजकावर आदळून पलटी झाली. यावेळी प्रवाशांना दोन्ही दारातून बाहेर पडणे अशक्य झाले. काही जणांनी आपत्कालीन दाराची काच फोडली अन् ते बाहेर पडले. त्याचवेळी बसची डिझेल टाकी फुटली अन् तिचा स्फोट झाला. त्यामुळे बसने पेट घेतली. बसमधील २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या २६ जणांमध्ये कारंजा तालुक्यातील शिवनगर येथील मनीषा विजय बहाले आणि संजय गोविंदराव बहाळे हे आहेत का? हे अद्याप स्पष्ट झाले नव्हते.

Non Stop LIVE Update
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.