Buldhana Accident : बुलढाण्यात मलकापूरजवळ भीषण अपघात, 3 ठार एक गंभीर

मुंबई-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरवरून धरणगावकडे जाणाऱ्या प्रवासी ऑटोला नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रकने समोरून जबर धडक दिली. या अपघातामध्ये ऑटोचा अक्षरश चुराडा झाला. यात चालकासह प्रवाशांमधील एकूण तीन जण ठार झाले आहेत.

Buldhana Accident : बुलढाण्यात मलकापूरजवळ भीषण अपघात, 3 ठार एक गंभीर
बुलढाण्यात मलकापूरजवळ भीषण अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 5:46 PM

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मलकापूर शहराजवळ कंटेनर ट्रक आणि प्रवाशी ऑटोमध्ये समोरासमोर झाल्ने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 3 जण ठार (Death) तर 1 जण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त प्रवासी ऑटो मलकापूरहून धरणगावकडे चालली होती. तर कंटेनर नागपूरच्या दिशेने चालला होता. गंभीर जखमीला मलकापूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरु आहेत. अपघाताची स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.(A major accident near Malkapur in Buldhana three killed and one seriously injured)

अपघातामध्ये प्रवासी रिक्षाचा चुराडा

मुंबई-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरवरून धरणगावकडे जाणाऱ्या प्रवासी ऑटोला नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रकने समोरून जबर धडक दिली. या अपघातामध्ये ऑटोचा अक्षरश चुराडा झाला. यात चालकासह प्रवाशांमधील एकूण तीन जण ठार झाले आहेत. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला मलकापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

भंडाऱ्यात खाजगी कारला झालेल्या अपघातात एक ठार एक जखमी

नागपूर येथे शिकणाऱ्या मुलीची भेट घेत रात्रीच्या सुमारास खाजगी चारचाकी वाहनाने पुतण्यासह स्वगावी परतत असताना उभ्या ट्रकला दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाले. उमरेड-भिवापूर राज्य महामार्गावर हा अपघात घडला. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा पुतण्या गंभीररित्या जखमी झाला. या घटनेत बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता अशोक नंदेश्वर (57) असे मयत महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. तर सुमीत दौलत नंदेश्वर (32) असे जखमी पुतण्याचे नाव आहे. (A major accident near Malkapur in Buldhana three killed and one seriously injured)

इतर बातम्या

Pune Protest : पुण्यात कात्रज पाणी प्रश्न पेटला, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

Nanded | बिल्डर संजय बियाणींच्या हत्येचे गूढ कायम, CBI कडे तपासाची मागणी, खा. चिखलीकर उद्या निदर्शनं करणार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.