मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याने राहुल गांधी नाराज? अमित शाह यांचा काँग्रेसमध्ये घमासानचा दावा

बुलढाण्यातील मलकापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. यावेळी अमित शाह यांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याबाबत धक्कादायक दावा केला. त्यांच्या वक्तव्यावर आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याने राहुल गांधी नाराज? अमित शाह यांचा काँग्रेसमध्ये घमासानचा दावा
अमित शाह यांचा काँग्रेसमध्ये घमासानचा दावा
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 4:08 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे सभा पार पडली. या सभेत अमित शाह यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबाबत धक्कादायक दावा केला. “मी सर्वांना सांगू इच्छितो, महाविकास आघाडीने भरपूर गॅरंटी दिल्या आहेत. पण आताच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे खरं बोलून गेले. त्यामुळे काँग्रेस खासदार राहुल गांधी हे नाराज झाले. पूर्ण होतील असेच आश्वासने द्या, असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. कारण काँग्रेसने कर्नाटक, हिमाचल, तेलंगणामध्ये जेवढ्या गॅरंटी दिल्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. ही महाविकास आघाडीची गॅरंटी झूठची गॅरंटी आहे. ही गॅरंटी भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे. महाविकास आघाडीची गॅरंटी ही भाऊ-पुतण्या वाद आणि तुष्टीकरणाची गॅरंटी आहे”, अशी टीका अमित शाह यांनी केली.

“आज शिवप्रताप दिवस आहे. 10 नोव्हेंबरलाच शिवाजी महाराजांनी आज अफजल खानाचा वध करुन विजापूरला करारा जवाब दिला होता. आज शिवप्रताप दिनाच्या दिवशी सर्वांनी इथून एक संकल्प घेऊन जायचा आहे की, अफजल खानाच्या मार्गावर चालणाऱ्या महाविकास आघाडीचा पराभव करायचा आहे. मला सांगा, आमच्या चारही उमेदवारांना तुम्ही जिंकवणार ना? ही लढाई शिवाजी महारांजा मार्ग आणि अफजल खानचा मार्ग यांच्यामधली लढाई आहे”, असा दावा अमित शाह यांनी केला.

‘अयोध्येत राम मंदिर बनायला हवं होतं की नाही?’

“या आघाडीने तृष्टीकरणाची सीमा गाठली. अयोध्येत राम मंदिर बनायला हवं होतं की नाही? 70 वर्षांपासून काँग्रेस पक्ष राम मंदिराच्या मुद्द्याला लटकवत राहिला. मोदींना तुम्ही पंतप्रधान केलं, यानंतर 5 वर्षात कोर्टात केस जिंकली आणि मंदिरदेखील बांधून दाखवलं. या दीपावलीला 550 वर्षांनंतर रामलल्ला आपल्या भव्य मंदिरात बसले आहेत. केवळ राम मंदिरच नाही तर औरंगजेबाने काशी, विश्वनाथ कॉरिडोअर तोडलं होतं. मोदींनी काशी, विश्वनाथ कॉरिडोअर देखील पुन्हा बनवलं. तुटलेलं सोमनाथचं मंदिर नवं बनलंच होतं, आता मोदींच्या नेतृत्वात सोमनाथांचं मंदिर सोन्याचं बनत आहे”, असं अमित शाह म्हणाले.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.