‘शिवाजी महाराजांच्या धर्तीवर उभा राहून सांगतो, तुमच्या चार पिढ्या देखील…’, अमित शाह यांचा राहुल गांधींवर घणाघात
"राहुल बाबा, शिवाजी महाराजांच्या धर्तीवर उभा राहून सांगतो, तुम्हीच काय तुमच्या चार पिढ्या देखील काश्मीरमध्ये कलम 370 लागू करु शकत नाही. मोदींनी देशाला सुरक्षित करण्याचं काम केलं. 10 वर्षे यूपीएचं सरकार होतं. 10 वर्षांपर्यंत पाकिस्तानचे अतिरेकी यायचे आणि बॉम्ब हल्ले करुन आरामात चालले जायचे", असा घणाघात अमित शाह यांनी राहुल गांधींवर केला.
“मला सांगा सर्वजण काश्मीर आपलं आहे की नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमधून कलम 370 हटवलं. मी संसदेत कलम 370 चं विधेयक घेऊन उभा राहिलो तेव्हा शरद पवार, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, स्टॅलिन सर्वांनी विरोध केला. ते म्हणायचे, हटवू नका. मी म्हटलं, का नको? तर ते म्हणाले, काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील. अरे राहुल बाबा, 6 वर्षे झाले. रक्तांचे पाट सोडा कुणाचा दगड मारण्याची हिंमत नाही. काश्मीरमध्ये नॅशनल कॉम्फरन्सचं सरकार बनलं. काँग्रेस या पक्षाचा साथीदार आहे. निवडून आल्यानंतर या पक्षांनी काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 आणायचं, असा प्रस्ताव पारित केला”, असा आरोप अमित शाह यांनी केला.
“राहुल बाबा, शिवाजी महाराजांच्या धर्तीवर उभा राहून सांगतो, तुम्हीच काय तुमच्या चार पिढ्या देखील काश्मीरमध्ये कलम 370 लागू करु शकत नाही. मोदींनी देशाला सुरक्षित करण्याचं काम केलं. 10 वर्षे यूपीएचं सरकार होतं. 10 वर्षांपर्यंत पाकिस्तानचे अतिरेकी यायचे आणि बॉम्ब हल्ले करुन आरामात चालले जायचे. मोदींचं 2014 सरकार आले. उरी आणि पुलवामामध्ये हल्ला झाला. मोदींनी 10 दिवसातच पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही आघाडी देशाला सुरक्षित ठेवू शकते का? त्यांची व्होट बँकची लालच त्यांना काहीही करायला तयार करते. नरेंद्र मोदींनी देशाला सुरक्षित आणि समृद्ध केला”, असं अमित शाह म्हणाले. “आपली अर्थव्यवस्था 2027 मध्ये जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल”, असंदेखील अमित शाह यावेळी म्हणाले.
अमित शाह यांचा नाना पटोलेंवर प्रहार
“नुकतंच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात ओबीसी, दलित, मागास वर्ग, आदिवासींचं आरक्षण संपवून मुसलमानांना आरक्षण दिलं पाहिजे. नाना पटोलेंनी त्यांना पत्र देखील दिलं. आमचं सरकार आलं तर आरक्षण देऊ. अल्पसंख्यांकाना मागासलेल्यांचं आरक्षण द्यायला हवं का? मागास समाजाचं आरक्षण कमी करायला हवं का? दलित, आदिवासींचं आरक्षण कमी करायला हवं का? तुम्ही चिंता करु नका. ना त्यांचं सरकार येणार आणि ना आम्ही त्यांना आरक्षण कमी करु देणार. जोपर्यंत भाजपचा एक आमदार आणि खासदार विधानसभा आणि लोकसभेत आहे तोपर्यंत दलित, आदिवासी आणि मागास समाजाच्या आरक्षणाला हात लाऊ देणार नाही”, अशी ग्वाही अमित शाह यांनी दिली.