AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एकनाथ खडसे यांना काहीच काम शिल्लक नाही”, पाहा ही टीका कुणी केलीय

मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे यांच्याकडून सध्या भाजपवर जोरदार टीका केली जात आहे.

एकनाथ खडसे यांना काहीच काम शिल्लक नाही”, पाहा ही टीका कुणी केलीय
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 7:11 PM

बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे ज्यावेळी भाजपमध्ये होते, त्यावेळेपासून त्यांच्यावर भाजपमधूनच आपल्यावर कुरघोड्या झाली असल्याची टीका करत होते. आमदार एकनाथ खडसे यांनी कधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे तर कधी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. या दोघांकडूनही एकमेकांवर पातळी सोडून टीका केली जात आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांचे डोकं तपासून घ्यायला पाहिजे असा सल्ला त्यांनी त्यांना दिला होता. तर त्यांच्या त्या टीकेनंतर गिरीश महाजन यांच्यावरही त्यांनी टीका केली होती.

ही टीका करताना ते म्हणाले होते की, “काही वर्षांपूर्वी फर्दापूरच्या विश्रामगृहात एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत कोण पकडलं गेलं होतं? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा खडसे आणि महाजन हा वाद विकोपाला गेल्याने भाजप-राष्ट्रवादीचा राजकीय सामना आता पुन्हा एकदा तापला आहे. तर आज मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे यांच्याकडून सध्या भाजपवर जोरदार टीका केली जात आहे.

तर त्याचवेळी खडसे यांच्याकडून गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला जात आहे. गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना त्यांनी सध्या त्यांना काहीच काम नसल्याने त्यांना इतरांवर टीका करणे एवढच काम बाकी आहे.

त्याच बरोबर एकनाथ खडसे यांना काहीच काम शिल्लक नसल्याने त्यांच्याकडून बेतालपणे टीका केली जात आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

एकनाथ खडसे यांच्यावर गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना म्हणाले की, एकनाथ खडसे सध्या काहीही काम करत नाहीत. त्यामुळे टीका करणे हे काम करत असले तरी ते सध्या इकडे तिकडे कोण काय म्हणाले, कोण नाराज आहेत, कोण काय स्टेटमेंट करत आहे हेच ते बघत आणि ऐकत फिरत असतात असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनली सहाय्यक आयुक्त.
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?.
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.