Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलडाणा : दहा लाखांचा गांजा जप्त, तीन आरोपींना अटक

सोमवारी परराज्यातून बुलडाणा जिल्ह्यात आलेला तब्बल एक क्विंटल गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत अंदाजे 10  लाखांच्या आसपास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी तिन आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.

बुलडाणा : दहा लाखांचा गांजा जप्त, तीन आरोपींना अटक
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 9:58 AM

बुलडाणा : जिल्ह्यामध्ये अवैध धंदे वाढले आहेत, अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी परराज्यातून बुलडाणा जिल्ह्यात आलेला तब्बल एक क्विंटल गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत अंदाजे 10  लाखांच्या आसपास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी तिन आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.

नाकाबंदी दरम्यान कारवाई 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, परराज्यातून जिल्ह्यामध्ये गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी किन्ही महादेव फाटा परिसरात नाकाबंदी केली होती. नाकाबंदीदरम्यान पोलिसांना दोन दुचाकी समोरून येताना दिलस्या पोलिसांनी या दुचाकींना थांबवून झडती घेतली. या झडीमध्ये तब्बल एक क्विंटल गांजा  जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

गांजासह दोन दुचाकी जप्त

किन्ही महादेव फाटा परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदीदरम्यान दोन संशयित दुचाकी समोरून येत असल्याचे आढळून आले. आम्ही त्या दुचाकींची झडती घेतली असता गांजा आढळून आला.  आम्ही आरोपींच्या ताब्यातून गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत अंदाजे दहा लाखांच्या घरात आहे. आरोपींकडून एक क्विंटल गांजासह दोन दुचाकी, तीन मोबाईल असा एकूण 10 लाख 81 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तीनही आरोपींविरोधात हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

संबंधित बातम्या

Father Rapes Daughter | भिवंडीत पोटच्या मुलीवर बापाकडून बलात्कार, 14 वर्षांची पीडिता गरोदर

पोटच्या गोळ्याला कुत्र्याच्या पिल्लाजवळ सोडलं, एक दिवसाच्या बाळासोबत रात्रभर काय काय घडलं?

महिला रुग्णावर शारीरिक अत्याचार, अश्लील फोटो काढून तोतया डॉक्टर पसार