शेतकऱ्यांवरचं संकट संपता संपेना; भाव मिळाला नाही म्हणून उभ्या पिकात सोडली जनावरं..

सध्या दोनशे रुपये प्रति क्विंटलने भाव असूनदेखील त्याही भावात व्यापारी कांदा घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत असताना सदाशिव राऊत यांनी जमिनीतून कांदा पीक न काढता उभ्या पिकात जनावरे सोडली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांवरचं संकट संपता संपेना; भाव मिळाला नाही म्हणून उभ्या पिकात सोडली जनावरं..
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 7:54 PM

बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे राज्यातील विविध भागातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. तर दुसरीकडे शेतमलाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना उभ्या पिकावर नांगर फिरवला आहे. महिन्याभरापूर्वी पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात जोरदार अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. अवकाळीमुळे शेतातील पिकं कुजून गेली होती, तर दुसरीकडे जोरदार पाऊस झाल्यामुळे आलेल्या शेतमालाला योग्य बाजारभावही मिळाला नव्हता. शेतीचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर सरकारकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली मात्र ती अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही.

तर आता पुन्हा एकदा पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

कांद्याला भाव नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याने कांद्याच्या उभ्या पिकात जनावरे सोडली आहेत. गेल्या काही दिवसांपासून गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गारपीटाचा मोठा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याचे पीक शेतातच कांद्याचे पीक सडले आहे.

यावर्षीच्या रब्बी हंगामातदेखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अशातच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात गारपीटीमुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे, तर हे अस्मानी संकट कमी होते की काय, पुन्हा सुलतानी संकट ओढाऊन कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी आपला कांदा रस्त्यावर फेकून देत आहेत, तर काही शेतकऱ्यांनी उभ्या कांद्याच्या पिकात जनावरे चारली आहेत.

खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथील शेतकरी सदाशिव राऊत यांनी आपल्या तीन एकर शेतात खरीप हंगामात तीन एकर कपाशीची लागवड केली होती, मात्र बोंड अळी, लाल्या आणि अतिवृष्टीमुळे त्यांना लागलेला 50 हजार रुपये खर्चही त्यातून निघाला नाही, आणि त्यामुळे कांदा पिकातून किमान खर्च भरून निघेल अशी अपेक्षा सदाशिव राऊत यांना होती.

मात्र गेल्या महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटीमुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर गारपीट झाल्यामुळे कांदा पूर्णपणे जमिनीत सडला आहे.

तर आतापर्यंत त्यांना तीन एकरात कांदा पिकासाठी 90 हजार रुपये खर्च लागलेला आहे, तर काढण्यासाठी पुन्हा पन्नास हजार रुपये खर्च कुठून आणायचा असा सवाल त्यांच्यासमोर निर्माण झाला होता.

तर सध्या दोनशे रुपये प्रति क्विंटलने भाव असूनदेखील त्याही भावात व्यापारी कांदा घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत असताना सदाशिव राऊत यांनी जमिनीतून कांदा पीक न काढता उभ्या पिकात जनावरे सोडली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.