“ते आमदार मेरिटवर, विधानसभेच्या कायद्यावरच पात्र ठरणार”; शिवसेनेच्या आमदाराने ठणकावून सांगितले
राज्यातील जनता महाविकास आघाडीला स्वीकारणार नाही असं मत शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी व्यक्त केले आहे. तसेच तीन पक्षात कुठल्याही पक्षाचे कोणतंही धोरण नाही असं टोला मविआला लगावला आहे.
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या काही आमदारांसोबत अयोध्या दौरा करून पुन्हा राज्यात परतले आहेत. मात्र या दौऱ्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली आहे. तर विरोधकांच्या टीकेला सत्ताधारी शिंदे गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात एकीकडे अवकाळी आणि गारपीटीचे संकट असतानाही मुख्यमंत्र्यांनी दौरा काढल्याने या शेतकऱ्यांच्या विरोधात हे सरकार असल्याचा घणाघात विरोधकांनी केला होता. त्यांच्या या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांवर टीका करताना त्यांनी महाविकास आघाडीला त्यांनी बिघाडीला म्हटला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाले आहे का असा सवालही उपस्थित केला जात आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी विरोधकांना उत्तर देताना मविआच्या राजकारणाला दुय्यम स्थान देत महाविकास आघाडी ही राज्यासाठी बिघाडी आहे.
त्यामुळे राज्यातील जनता त्यांना स्वीकारणार नाही असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे. तीन पक्षात कुठल्याही पक्षाचे कोणतंही धोरण नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून 15 आमदार बाद होणार अपात्र होणार असा दावा केला जातो. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, 15 आमदार आम्ही मेरिट वर आणि विधानसभेच्या कायद्यावरच पात्र ठरणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसच त्यांनी बोलताना सांगितले की, खरंतर हा न्यायप्रविष्ठ विषय आहे. त्यामुळे त्यावर बोलणं योग्य होणार नाही.
तर आज अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचे सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, याबाबत आपल्याला काही बोलताना येणार नाही मात्र अंजली दमानिया यांना काही वेगळं कनेक्शन असेल ते त्यांना माहिती असं म्हणत त्यावर स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही.
आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, एकनाथ खडसे यांचे आता वय झाले आहे.
त्यामुळे त्यांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आमच्या पक्षाचा प्रश्न तर आमच्या पक्षात पक्ष सांभाळण्यासाठी नेते सक्षम आहे. त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये काय चाललं आहे ते बघावं असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.