Buldhana Crime : दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या आठ जणांना अटक, स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांची संयुक्त कारवाई
आरोपींच्या हालचालींवरुन पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी वाहनांची झडती घेतली असता कारमध्ये मिरचीपूड, सुती दोरी, धातूचे गोल 50 शिक्के, दोन लाकडी दांडे, एक लोखंडी तलवार, एक लोखंडी चाकू, बारा मोबाईल आणि एक लोखंडी धातूचा सुरा तसेच एक काचेची बंद नळी असे गुन्ह्यात वापरले जाणारे साहित्य मिळून आले. पोलिसांनी तात्काळ गाडीत उपस्थित आठ आरोपींना ताब्यात घेतले.
बुलढाणा : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शेगाव-वरवट रोडवर दबा धरून बसलेल्या आठ जणांना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा आणि शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे. शहरातील अवैध धंद्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी संयुक्त गस्त करीत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून दरोडा अथवा वाटमारी करण्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी हत्यारे (Weapons) आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींमध्ये बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव खान्देश जिल्ह्यातील आरोपींचा समावेश आहे. (Eight accused who were preparing to commit robbery in Buldhana, were arrested along with weapons)
रात्रीच्या वेळी गस्त घालताना पोलिसांनी संशयित वाहनाची झडती घेतली
शेगाव शहरापासून 3 किमी अंतरावर वरवट रोडवरील गॅस गोडाऊन जवळ काल रात्री अंधारामध्ये एक पांढऱ्या रंगाची गाडी लाईट बंद करून उभी होती. तर शेजारीच एक मोटारसायकलही उभी होती. या दोन्ही वाहनातील व्यक्ती हळूच बोलत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या वाहनांची स्थिती बघता पोलिसांना संशय आला. यावेळी दुचाकीचालक हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांना घेराव टाकून त्यांना जागीच पकडण्यात आले. त्याठिकाणी असलेल्या व्यक्तींना पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि वाहनात एकमेकांशी चुळबूळ करू लागले.
आरोपींकडून 7 लाखाचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या हालचालींवरुन पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी वाहनांची झडती घेतली असता कारमध्ये मिरचीपूड, सुती दोरी, धातूचे गोल 50 शिक्के, दोन लाकडी दांडे, एक लोखंडी तलवार, एक लोखंडी चाकू, बारा मोबाईल आणि एक लोखंडी धातूचा सुरा तसेच एक काचेची बंद नळी असे गुन्ह्यात वापरले जाणारे साहित्य मिळून आले. पोलिसांनी तात्काळ गाडीत उपस्थित आठ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी एकूण 7 लाख 10 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेलं सर्व आरोपी बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील आहेत. (Eight accused who were preparing to commit robbery in Buldhana, were arrested along with weapons)
इतर बातम्या
Pune Cyber Crime | लग्न करण्याच्या बहाण्याने महिलेने तरुणाला लावला 9 लाखांना चुना