‘खोके घेतल्याचा पुरावा द्या, तुमचे आयुष्यभर पाय चेपू’, शिंदे गटाच्या आमदाराचं उद्धव ठाकरे यांना खुलं चॅलेंज

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तांतरासाठी खोके (पैसे) घेतल्याचे पुरावे द्यावे. त्यांनी पुरावे दाखवल्यास आम्ही आयुष्यभर त्यांचे पाय चेपू, असं आव्हान शिंदे गटाकडून देण्यात आलंय.

'खोके घेतल्याचा पुरावा द्या, तुमचे आयुष्यभर पाय चेपू', शिंदे गटाच्या आमदाराचं उद्धव ठाकरे यांना खुलं चॅलेंज
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 4:58 PM

बुलढाणा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तांतरासाठी खोके (पैसे) घेतल्याचे पुरावे द्यावे. त्यांनी पुरावे दाखवल्यास आम्ही आयुष्यभर त्यांचे पाय चेपू, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं. उद्धव ठाकरे यांच्याकडे टीका करण्यासाठी दुसरे कोणतेच विषय नाहीत. त्यामुळे ते खोक्यांचा आरोप करत आहेत, असाही दावा त्यांनी केला. तसेच खोके कुणाकडे जाऊ शकतात ते सर्वांना माहितीय, असा टोला संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

“जे बोलले ते खोके, बोके या विषयीच बोलले. याशिवाय त्यांच्याकडे दुसरा विषयच नाही. खोक्यांच्या विषयाशिवाय दुसरा विषय तुम्हाला गेल्या तीन-चार महिन्यामध्ये मांडता आला?”, असा सवाल संजय गायकवाड यांनी केला.

“उद्धव ठाकरेंनी सीआयडी किंवा कोणतीही तपास यंत्रणाच्या माध्यमातून एक तरी पुरावा खोक्यांच्या आणून दाखवावा. त्यांनी जर हे केलं तर आम्ही आयुष्यर त्यांचे पाय चेपत बसू. त्यांनी एकदा तरी सिद्ध करुन दाखवावं”, असं आव्हान संजय गायकवाड यांनी दिलं.

उद्धव ठाकरेंनी काल बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी संवाद मेळावा आयोजित केला होता. पण याच मेळाव्यावरुन संजय गायकवाड यांनी निशाणा साधला. “पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा मेळावा कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण जेवढ्या लोकांनी त्या ठिकाणी भाषण केलं त्यापैकी कुणीही शेतकऱ्यांच्या विषयवार बोललं नाही”, असं संजय गायकवाड म्हणाले.

“शेतकऱ्यांच्या व्यथा, दु:ख, वेदना, अडचणी यावर कोणी बोललं नाही. तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सरकारने काय करावं, याबद्दलही कुणी काहीच बोललं नाही. मला त्या सभेमधून शेतकऱ्यांसाठी काही निष्पन्न झालं, असं काही दिसलं नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“या लोकांना महाराष्ट्रामध्ये दुसरे काही प्रश्न शिल्लक राहिलेले दिसत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलायचं की, महाराष्ट्रात देव नाही का? मग गुवाहाटीतील देव काही हिंदू धर्मियांचे देव नाहीत का? त्यांच्या दर्शनाला जाऊ शकत नाही का?” असे सवाल संजय गायकवाड यांनी केले.

“एकनाथ शिंदेंना बोलतात की त्यांना स्वत:चं भविष्य नाही, लोकांचं भविष्य काय घडवणार? तुमचं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचं काय भविष्य आहे? शिवसेना-भाजप या नैसर्गिक युतीमध्ये आम्ही आहोत. पण तुम्ही सगळं अनैसर्गिक करुन बसले. तुमचं काय भविष्य आहे मग?”, असा प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला.

“आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असल्यामुळे भाजपच्या तिकीटावर लढण्याचा प्रश्नच नाही. आम्ही धनुष्यबाणावरच निवडणूक लढणार आहोत. एवढंच होईल की, आम्ही भाजप-शिवसेना युतीत लढू”, असंदेखील ते म्हणाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.