“लोकसभा, विधानसभा एकत्र होतील असं काही वाटत नाही”; शिवसेनेच्या नेत्याने आगामी काळातील निवडणुकीवर महत्वाचं ते सांगितलं
आता सत्ताधारी गटातील आमदारही आता अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. संजय शिरसाठ यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी ठरवल्याप्रमाणे वन नेशन, वन इलेक्शन ही संकल्पना राबविण्याचा विचार त्यांनी मांडला आहे.
बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेसेचे आमदार छगन भुजबळ यांनी निवडणुका कधी घ्या, आम्ही तयार आहे असा थेट इशारा सत्ताधाऱ्यांना दिल्यानंतर आता राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. छगन भुजबळ यांनी सत्ताधाऱ्यांना निवडणुकीच्या कारणावरून डिवचल्यानंतर आता सत्ताधारी पक्षानेही आता जशास तसे उत्तर दिले आहे. आगामी काळातील निवडणुकीवरूनच आमदार संजय शिरसाठ यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्र निवडणुकीवरून आपले मत सांगताना सांगितले की, लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्या तर निवडणुकीवर होणारा वारेमाफ खर्चही वाचणार आहे. त्याचबरोबर दोन्ही निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळाचाही योग्य वापर करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार संजय शिरसाठ यांनी आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जर एकत्र झाल्या तर त्याचा फायदाच होणार आहे. मात्र तसे काही वाटत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्याचबरोबर विरोधी गटातील आमदार छगन भुजबळ यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे की, निवडणुका कधीही घ्या आम्ही तयार आहोत.
त्यामुळे आता सत्ताधारी गटातील आमदारही आता अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. संजय शिरसाठ यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी ठरवल्याप्रमाणे वन नेशन, वन इलेक्शन ही संकल्पना राबविण्याचा विचार त्यांनी मांडला आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुका एकत्र आल्या तर त्याचा फायदाच होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार संजय शिरसाठ यांनी बोलातना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही लोकांनी आगामी निवडणुका या एकत्र होणार असल्याचा तर्क वितर्क लढविला आहे.
त्यांनी हा तर्क लढविला असला तरी त्यांना ही माहिती कुठून मिळते हा प्रश्न आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. या एकत्र निवडणुका झाल्या तर त्याचा फायदा प्रशासनालाच होणार आहे.
कारण त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि त्यावर होणारा खर्चही वाचणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तर मात्र त्यासाठी आमचीही तयारी असून वन नेशन आणि वन इलेक्शनलाही आमचे समर्थन असणार असल्याचेही आमदार संजय शिरसाठ यांनी स्पष्ट केले आहे.