Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटातील 17 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; या जिल्ह्यात शिंदे गटाला मोठा धक्का

17 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे दिले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात घाटा खालील भागात शिंदे सेना खिळखिळी झाली आहे.

शिंदे गटातील 17 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; या जिल्ह्यात शिंदे गटाला मोठा धक्का
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 3:10 PM

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात नवीन चेहऱ्याला तालुकाप्रमुख पदी नियुक्ती देणार आहेत. त्यामुळे शिंदे गटातील शिवसेनेत अस्वस्थता आहे. त्यावर आक्षेप घेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, खामगाव तालुकाप्रमुख सुरेश वावगे, युवासेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे, शहराध्यक्ष रमेश भट्टड यांच्या सह 17 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे दिले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात घाटा खालील भागात शिंदे सेना खिळखिळी झाली आहे. शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रतापराव जाधव यांच्या नावाने हे पत्र लिहण्यात आले आहे.

राजीनामा पत्रात नेमकं काय?

या पत्रात ते लिहितात, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आपण खामगाव तालुका प्रमुखपद बदल करत आहात. या पदावर देण्यात येणार असलेली व्यक्ती त्या पदासाठी लायक नाही. त्यांना ग्रामीण भागातील पदाधिकारी उदा. विभागप्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपशाखाप्रमुख, शिवसैनिक युवासेना, विद्यार्थी सेना पदाधिकारी कोणीही ओळखीचे नाहीत. ग्रामीण भागातील गावांचीसुद्धा माहिती नाही. यापूर्वी त्यांनी कोणत्याही संघटनेत काम केले नाही. शिवसेनेत येऊन इन-मीन दोन महिने झाले. अशा व्यक्तीची नियुक्ती आपण सरळ तालुका प्रमुख पदावर करत आहात. त्यामुळे आमची तीव्र नाराजी आहे. आम्ही त्या व्यक्तीसोबत काम करू शकत नाही. करिता शिवसेना पदाधिकारी आपल्या पदाचे राजीनामे देत आहोत.

हे सुद्धा वाचा

पत्रावर सह्या कुणा-कुणाच्या?

उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, खामगाव तालुकाप्रमुख सुरेश वावगे, युवासेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे, उपतालुकाप्रमुख गजानन सातव, गजानन हुरसाड, गोपाल भिल, शहर प्रमुख रमेश भट्ट, शैलेंद्र चौव्हाण, करण, पाटेखेडे, गौरव देशमुख, नमन टिकार, विष्णू काळे, नीलेश देवताळू, विक्की सारवान, आत्माराम बगाडे, अक्षय सूर्यवंशी, चेतन गायकवाड यांनी या पत्रावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे खामगाव तालुक्यात शिवसेना खिळखिळी होणार आहे.

भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.